भाजपचा वृक्षारोपण, सेफ्टी किट्स, घरगुती गॅस सुरक्षितता उपक्रम
नेरूळ (बातमीदार) ः भाजपच्या वतीने शनिवारी (ता. २०) पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील विविध ठिकाणी वृक्षारोपण, मलनिस्सारण कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सेफ्टी किट्स वाटप आणि घरगुती गॅस सुरक्षा आदी सामाजिक उपक्रम राबविले.
वाशी रेल्वेस्थानक परिसर, सानपाडा, सोनखार, जुईनगर येथे भाजप कार्यकर्त्यांसह माजी नगरसेविका फशिबाई भगत यांनी वृक्षारोपण केले. मलनिस्सारण, हिवताप निर्मूलन व पालिका आणि महावितरण विभागातील कंत्राटी कर्मचारी यांना सेफ्टी किट्सचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत महिलांसाठी आर्थिक बचत व गुंतवणुकीबाबतीत वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींसोबत मार्गदर्शन शिबिर भरवण्यात आले.