निजामपूर बाजारपेठेत कार पेटली
माणगाव (वार्ताहर) ः माणगाव तालुक्यातील निजामपूर बाजारपेठेत मंगळवारी (ता. २३) रात्री दोनच्या सुमारास एका कारने अचानक पेट घेतला. चालकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली असली तर वाहनाचे मात्र नुकसान झाले आहे.
गोवा येथून कारने पुण्याच्या दिशेने निघालेले रविचंद्रन प्रसाद निजामपूर येथे थांबले होते. त्याच वेळी त्यांच्या गाडीने अचानक पेट घेतला. याबाबतची माहिती तत्काळ माणगाव अग्निशमन दलाला देण्यात आली. या घटनेत आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवण्यात आल्याने जीवितहानी टळली आहे; पण वाहनाचे मात्र नुकसान झाले.