मुंबई

विकासकांविरोधात कारवाई नाही; फेरीवाल्यांवर कारवाई तत्परतेने

CD

विकसकांविरोधात कारवाई नाही;
फेरीवाल्यांवर कारवाई तत्परतेने!
महापालिकेच्या कृतीवर न्यायालयाची नाराजी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः न्यायालयाच्या आदेशानंतरही महापालिका विकसकांविरोधात कारवाई करत नाही; मात्र फेरीवाल्यांवर तत्परतेने कारवाई करते, असा टोला उच्च न्यायालयाने नुकताच लगावला.  मुलुंड (पूर्व) येथील फेरीवाल्यांची बाजू ऐकून न घेता त्यांच्याविरोधात कारवाई करणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या कारवाईबाबत आणि फेरीवाल्यांना पर्यायी जागा उपलब्ध करण्याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेशही महापालिकेला दिले.
फेरीवाल्यांनी सादर केलेल्या निवेदनावर विचार करा, असे आदेश असतानाही दुसऱ्या दिवशी या फेरीवाल्यांना हटवण्याची कारवाई महापालिकेने केली. त्यामुळे फेरीवाल्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्या. महेश सोनक आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने याचिकेची दखल घेऊन महापालिकेच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या आदेशांचे पालन करीत नाही. विशेषतः बांधकाम व्यावसायिकांवर कारवाईच्या मागणीसाठी याचिकाकर्त्यांना महापालिका प्रशासनाविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्यास भाग पाडले जाते, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. तसेच महापालिकेने घाईघाईत याचिकाकर्त्याच्या दुकानांवर कारवाई केली. परिणामी, त्यांना निवेदन सादर करण्यासाठी मुदतही दिली नाही. त्यामुळे महापालिकेचा युक्तिवाद आणि याच कारणास्तव याचिकेला विरोध करणे चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN: शिवम दुबेला तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला का पाठवलं? कर्णधार सूर्यकुमारने खरं कारण सांगितलं

Asia Cup 2025: भारताविरुद्ध कोण खेळणार फायनल! बांगलादेश - पाकिस्तान संघासाठी 'करो वा मरो'; जाणून घ्या संपूर्ण समीकरण

Asia Cup 2025: भारतीय संघाची फायनलमध्ये एन्ट्री! बांगलादेशला सुपर फोरमध्ये दिली मात; अभिषेक - कुलदीप पुन्हा हिरो

Dahisar Toll Naka: दहिसर टोलनाक्यावरून वाद; 'या' जागी स्थलांतर करण्याचा निर्णय, मंजूरीसाठी प्रताप सरनाईकांची नितीन गडकरींकडे धाव

Mumbai Crime: अंधेरीत दुहेरी हत्याकांड! तरुणाने वडील आणि आजोबांना संपवलं; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT