मुंबई

सुरक्षिततेला तिलांजली

CD

सुरक्षिततेला तिलांजली
कल्याण-शिळ रस्त्यावरील मेट्रो १२ प्रकल्पात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष; प्रवाशांचा जीव धोक्यात

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ ः कल्याण-शिळ रोडवर मेट्रो १२ प्रकल्पाचे काम सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, या प्रकल्पाला वेग दिला जात आहे; मात्र कामाचा वेग वाढवताना सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा पूर्णपणे विसर पडलेला दिसतो. ठाणे-भिवंडी मेट्रोकामाच्या ठिकाणावरून पडलेली सळई रिक्षातून प्रवास करणाऱ्या युवकाच्या डोक्यात घुसून अपघात घडला होता. या दुर्घटनेनंतरही प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही.

रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असताना, अवजड क्रेन्सद्वारे लोखंडी साहित्य उचलणे, मोठमोठ्या पत्र्यांची ने-आण करणे अशी कामे भरदिवसा चालू असतात. या कामादरम्यान कुठलीही सुरक्षा उपाययोजना राबवताना दिसत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने कुठेही जाळ्या, सूचनाफलक, दिशादर्शक कर्मचारी दिसत नाहीत. परिणामी, या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव सतत धोक्यात आहे. रस्ता आधीच अरुंद असून, कामामुळे वाहतुकीसाठी फक्त एकच लेन खुली आहे. यामुळे या भागात दररोज मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी कामावर जाणाऱ्या व येणाऱ्या लोकांना याचा फार त्रास सहन करावा लागत आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो पाच या मार्गावर नारपोली नाका ते धामणकर नाका या कामाच्या दरम्यान पुलावरून सळई पडली. ही सळई रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षातील प्रवाशाच्या थेट डोक्यात घुसली होती. यामध्ये सोनू अली हा २० वर्षांचा तरुण गंभीर जखमी झाला होता. याआधी नोव्हेंबर २०२१ मध्ये मेट्रो पाच या मार्गावर मेट्रोच्या पिलरचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना लोखंडी पिलरच्या सळईचा सांगाडा कोसळून पाच कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनांमुळे मेट्रोकामातील कंत्राटदाराची हलगर्जी आणि प्रवाशांची असुरक्षितता या बाबी उघड झाल्या होत्या.

कल्याण-शिळ रोडवर मेट्रो १२ प्रकल्पाचे काम सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता या कामाने गती पकडली आहे. मेट्रोचे पिलर उभे करण्यासाठी लागणाऱ्या लोखंडी सांगाड्याची क्रेनच्या साहाय्याने उभारणी करण्यात येत आहे. मोठमोठे पत्रे तसेच लोखंडी सळ्या या क्रेनच्या साहाय्याने हलविल्या जात आहे. रस्त्यावर भरदिवसा ही कामे सुरू असून या साहित्याची अवजड वाहने, क्रेन या रस्त्यावरच उभ्या केलेल्या असतात. मेट्रोच्या कामामुळे आधीच हा मार्ग अरुंद झाला आहे. केवळ एका लेनवरून वाहनांचा प्रवास सुरू आहे. त्यामुळे या भागात वाहनांची कोंडीदेखील होताना पाहायला मिळते.

सकाळ-संध्याकाळ येथे वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यातच काम सुरू असलेल्या ठिकाणी अवजड वाहने उभी असल्याने तेथून इतर वाहनांना जाण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने या वाहनांच्या आजूबाजूलादेखील वाहनांच्या रांगा लागतात. अशावेळी एखादा अपघात झाल्यास त्याखाली नेमकेच कोणते ना कोणते वाहन हे सापडू शकते, याची शक्यता नाकारता येत नाही. काम सुरू असताना याठिकाणी कंत्राटदार किंवा वाहनचालकांना सूचना देण्यासाठी कोणीही कामगार उभे नसतात. सुरक्षिततेसाठी जाळ्या अथवा इतर साधने कोठेही लावलेली दिसत नाहीत.

समाजमाध्यमांमध्ये व्हिडिओ व्हायरल
नागरिकांनी या असुरक्षिततेविरुद्ध आवाज उठवला आहे. अनेकांनी समाजमाध्यमांवर या कामाचा व्हिडिओ व्हायरल करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. रात्रीच्या वेळी कामे करावीत, पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, आवश्यक ते सूचनाफलक लावावेत आणि दूर अंतरावरून वाहनचालकांना सूचना देणारे कर्मचारी तैनात करावेत, अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत; मात्र आजपर्यंत त्यावर कोणतीही ठोस कृती झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : संकटाच्या काळात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या सरकार पाठीशी राहणार

Parli Vaijnath : ओबीसी आरक्षण संपले! पोलीस भरतीत मुले लागत नाहीत, या विवंचनेतून ओबीसी बांधवाने संपवलं जीवन

इलेक्ट्रिक SUV चाहत्यांसाठी खुशखबर! Volvo EX30 ची भारतात एन्ट्री; वाचा दमदार फीचर्स आणि धमाकेदार किंमत

Pune News : ससूनमध्ये रुग्णाची उडी मारून संपविले जीवन?

Mahadevi Elephant Return : कोल्हापूर ब्रेकिंग, महादेवी हत्ती परत आणण्यासाठी संयुक्त प्रस्तावाचा आदेश, हाय पॉवर कमिटी सकारात्मक, हत्ती परत येणार का?

SCROLL FOR NEXT