मुंबई

पालघर सिन्नर राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था

CD

पालघर-सिन्नर महामार्गाची दुरवस्था
खड्डे आणि धुळीने वाहनचालक हैराण ः प्रशासनाचे दुर्लक्ष
महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात आणि जीवितहानीची शक्यता, वाहनचालकांची गैरसोय
मनोर, ता. २४ ः पालघर-सिन्नर राष्ट्रीय महामार्गाची खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्याची चाळण झाली आहे. पावसाळ्यात महामार्गाची देखभाल दुरुस्तीच्या कामात सातत्य नसल्याने खड्ड्यांची संख्या वाढली आहे. खड्डे बुजवण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. दरम्यान, पालघर-सिन्नर रस्त्याचा दर्जा राखण्यात महामार्ग विभागाला अपयश आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पालघरमध्ये जिल्हा मुख्यालय झाल्यापासून मनोर-पालघर रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. नंडोरे नाका, डुंगीपाडा, गणेश नगर, घोलविरा भागात मोठ्या संख्येने रहिवासी इमारती उभ्या राहिल्याने नागरी वस्तीत वाढ झाली आहे. रस्त्यालगत सेंट जॉन महाविद्यालय आणि वेवुर भागात औद्योगिक वसाहत असल्याने विद्यार्थी, कामगारांची मनोर-पालघर रस्त्यावर मोठी वर्दळ असते. यासोबतच बुलेट ट्रेन आणि रेल्वे चौपदरीकरणासारख्या राष्ट्रीय प्रकल्पांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात माती, मुरूम आणि खडी पावडरसारख्या गौण खनिजाची वाहतूक या रस्त्यावरून वाढली आहे. यामुळे रस्त्यावर धूळ उडत असून, वाहनचालकांच्या नाकातोंडात जात आहे. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
विक्रमगड तालुक्यातील भोपोली, केव फाटा, बांगरचोळा भागात क्रशर मशीनमधून खडी वाहतूक करणाऱ्या ट्रकची संख्या मोठी आहे. पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था नसल्याने जव्हार-फाटा ते पाचमाडपर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली आहे. या महामार्गावरील खड्डे बुजवून तत्काळ दुरुस्तीची कामे सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

पालघर ते विक्रमगडपर्यंतच्या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे. डांबर प्लांट बंद असल्यामुळे खड्डे बुजवण्याच्या कामात अडचण येत आहे. खड्डे बुजवण्यासाठी पाऊस थांबण्याची वाट पहिली जात आहे. लवकरच खड्डे बुजवून आणि डांबरीकरण केले जाईल.
- नीलेश जाधव, उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

या ठिकाणी खड्डे
मनोर आणि पालघर यादरम्यानच्या २० किलोमीटर अंतरावरील नेटाळी गावदेवी मंदिरालगत, हात नदीच्या पुलालगतचे वळण आणि सावरखंड उपकेंद्रालगत खड्डे पडले आहेत.

रस्त्याचा दर्जा सुमार
राष्ट्रीय महामार्ग विभागाने कंत्राटदाराकडून रस्त्याची दुरुस्ती केली होती, मात्र या कामाचा दर्जा सुमार असल्याचे समोर आले असून, पावसाळ्याच्या तीन महिन्यांतच रस्त्यावरील खड्ड्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : संकटाच्या काळात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या सरकार पाठीशी राहणार

Parli Vaijnath : ओबीसी आरक्षण संपले! पोलीस भरतीत मुले लागत नाहीत, या विवंचनेतून ओबीसी बांधवाने संपवलं जीवन

इलेक्ट्रिक SUV चाहत्यांसाठी खुशखबर! Volvo EX30 ची भारतात एन्ट्री; वाचा दमदार फीचर्स आणि धमाकेदार किंमत

Pune News : ससूनमध्ये रुग्णाची उडी मारून संपविले जीवन?

Mahadevi Elephant Return : कोल्हापूर ब्रेकिंग, महादेवी हत्ती परत आणण्यासाठी संयुक्त प्रस्तावाचा आदेश, हाय पॉवर कमिटी सकारात्मक, हत्ती परत येणार का?

SCROLL FOR NEXT