मुंबई

नलिनी फोरम ची जागतिक आंतरराष्ट्रीय तिसरी परिषद

CD

नलिनी फोरमची जागतिक परिषद श्रीलंकेत
भारतातील मच्छिमारांच्या समस्या मांडल्या
पालघर, ता. २४ (बातमीदार) ः नलिनी फोरमची जागतिक परिषद यंदा श्रीलंकेत नुकतीच पार पडली. या परिषदेत नॅशनल फिशवर्कर्स फोरम चे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी भारतातील मच्छिमारांच्या समस्या मांडल्या.
श्रीलंका स्टिअरिंग कमिटी फॉर न्येलेनी फोरम व आंतरराष्ट्रीय नियोजन समिती यांच्या वतीने ही परिषद ५ ते १३ सप्टेंबर या कालावधीत पार पडली. या परिषदेत जगभरातील शेतकरी, मच्छिमार, कष्टकरी, मजूर आदी संघटनांचे नेते, कार्यकर्ते आणि धोरण निर्माते सहभागी झाले होते. अनंत काल मासेमारी व्यवसाय टिकावा व पारंपारीक मच्छिमारांचा उदरनिर्वाह आबाधित रहावा. टिकाऊ शेती, कृषी-पर्यावरणशास्त्र, उत्पादक सहकारी संस्था आणि अन्न उत्पादकांचे हक्क या महत्त्वाच्या विषयांवर संवाद होऊन धोरणात्मक निर्णय यावेळी घेण्यात आले.
या परिषदेत रामकृष्ण तांडेल म्हणाले की, पाकिस्तान व श्रीलंकेत मासेमारी करताना पकडण्यात आलेल्या मच्छिमारांची त्वरित सुटका करण्यात यावी. विंध्वसक मासेमारी, इंडस्ट्रियल फिशिंगवर कारवाई करून बंदी आणवी, अशा महत्त्वाच्या सूचना त्यांनी मांडल्या. वर्ल्ड फोरम फिशर पिपल या मच्छिमारांच्या जागतिक संघटनेच्या दोन सभा झाल्या. रामकृष्ण तांडेल यांची वर्ल्ड फोरम फिशर पीपलच्या प्लॅनिंग कमिटीवर नियुक्ती कारण्यात आली.

किनारा हक्क कायद्याची मागणी
महाराष्ट्रातील वाढवण येथील महाकाय बंदर, केरळ येथील विहिंजन बंदर, कर्नाटकमधील होनावर, केनी-अंकोला बंदर व गोवा येथील वास्को बंदर यामुळे मच्छिमार विस्थापित होतील म्हणून सर्व बंदरे रद्द करण्यात यावीत आणि भारतातील आदिवाशी वन हक्क कायद्यानुसार किनारा हक्क कायदा आणण्याची मागणी रामकृष्ण तांडेल यांनी केली.

८०० प्रतिनिधींचा सहभाग
या नऊ दिवसाच्या कार्यशाळेमध्ये एकूण सर्व स्तरातील १०४ देशातील संघटनेच्या सुमारे ८०० प्रतिनिधींनी सहभाग घेतला. अनके भाषा असल्याने एकूण १८ भाषामध्ये भाषातंरित करण्यासाठी जवळ-जवळ ५० जण होते.

फोटो श्रीलंका येथे नलिनी फोरमची जागतिक मच्छीमारांची बैठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटातील गाडी नेमकी कुणाची? महत्त्वाची अपडेट समोर...

Amit Shah on Delhi Red Fort Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Delhi Red Fort blast Live Update : मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रूग्णालयात जाऊन घेतली जखमींची भेट; घटनास्थळाचीही पाहणी केली

Maharashtra Alert Delhi Blast : RSS कार्यालय ते मुंबईची IMP ठिकाणे; पुणे, कोल्हापुरात हाय अलर्ट, दिल्ली बॉम्ब हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाचा डोळ्यात तेल घालून तपास

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

SCROLL FOR NEXT