मुंबई

ठाण्यात रंगणार साहित्यवलय पुरस्कार वितरण सोहळा

CD

ठाण्यात रंगणार साहित्यवलय पुरस्कार सोहळा
पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांची संगीत मैफल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी दिला जाणारा साहित्यवलय पुरस्कार २०२५ सोहळा ठाण्यात रंगणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एंटरटेन्मेंट यांच्या वतीने या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून विविध साहित्य प्रकारांतील नामवंत लेखक-लेखिकांना सन्मानित केले जाणार आहे. पुरस्कारांचे यंदाचे द्वितीय वर्ष असून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून आलेल्या ३५० पुस्तकांमधून हे लेखक निवडले गेले आहेत. लेखकांना प्रोत्साहन देणे हा उपक्रमामागील उद्देश असल्याची माहिती आयोजक मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी दिली आहे.
साहित्यवलय पुरस्कार वितरण सोहळा १० ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर असून साहित्यविश्वातील मान्यवरांच्या आणि मनसे नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे, अशी माहिती मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी दिली. सोहळ्याच्या पूर्वार्धात पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचे गायन आणि त्यांचा शिष्य व धृपद एंटरटेनमेंटचे संचालक कवी, संगीतकार ऋग्वेद देशपांडे हे त्यांच्याशी साहित्यिक संवाद साधतील. संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन धृपद एंटरटेनमेंटच्या मानसशास्त्रज्ञ पूजा देशपांडे करतील. साहित्यवलय या पुरस्काराचे स्वरुप पाच हजार ५५५ रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे. तर लक्षवेधी साहित्यासाठी एक हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी दिली.

यांचा होणार सन्मान
साहित्य पदार्पण - ‘सारंगीचे सूर’ - दीपक मच्याडो (बोरीवली)
सर्वोत्कृष्ट कादंबरी - ‘सवाष्ण’ - डॉ. क्षमा गोवर्धने शेलार (जुन्नर)
सर्वोत्कृष्ट स्त्रीवादी साहित्य -‘बाय गं’ - विद्या पोळ जगताप (सातारा)
कथासंग्रह - ‘वर्जीतमध्य’ - सुरेंद्र दरेकर (पुणे)
ललित लेखन - ‘सरतं काही सोडू नये’ - सुनील यावलीकर (अमरावती)
अनुवादित साहित्य - ‘देवाची स्वाक्षरी’- ए आर नायर आणि जे ए थेरगावकर (कल्याण-डोंबिवली)
वृत्तबद्ध काव्यसंग्रह - ‘रंध्रात भीनावा छंद’ - कांचन सावंत (तळेगाव)
कवितासंग्रह - ‘जामिनावर सुटलेला काळा घोडा’ - धनाजी धोंडीराम घोरपडे (सांगली)
गजल संग्रह -‘निव्वळ योगायोग’- प्राजक्ता पटवर्धन (पुणे)
बालसाहित्य - ‘थेंबा थेंबाची कहाणी’ - गणेश भाकरे (नागपूर)
ऐतिहासिक साहित्य - ‘पाकिस्तान का मतलब क्या’ श्रीधर लोणी (पुणे)

लक्षवेधी पुरस्कारासाठी सात जणांची निवड
दरम्यान यावर्षी ‘लक्षवेधी साहित्य पुरस्कार’ अंतर्गत सात साहित्यिकांची निवड झाली आहे. यामध्ये कल्पना बांदेकर (सावंतवाडी), मृणालिनी चितळे (पुणे), सागर जाधव जोपुळकर (नाशिक), आदित्य अंकुश संतोषी (ठाणे), डॉ. सुमन नवलकर(वडाळा), रामदास खरे (ठाणे) आणि प्रदीप कुलकर्णी (मुलुंड) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : संकटाच्या काळात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या सरकार पाठीशी राहणार

Parli Vaijnath : ओबीसी आरक्षण संपले! पोलीस भरतीत मुले लागत नाहीत, या विवंचनेतून ओबीसी बांधवाने संपवलं जीवन

इलेक्ट्रिक SUV चाहत्यांसाठी खुशखबर! Volvo EX30 ची भारतात एन्ट्री; वाचा दमदार फीचर्स आणि धमाकेदार किंमत

Pune News : ससूनमध्ये रुग्णाची उडी मारून संपविले जीवन?

Mahadevi Elephant Return : कोल्हापूर ब्रेकिंग, महादेवी हत्ती परत आणण्यासाठी संयुक्त प्रस्तावाचा आदेश, हाय पॉवर कमिटी सकारात्मक, हत्ती परत येणार का?

SCROLL FOR NEXT