मुंबई

धूम्रपान न करणाऱ्यांनाही फुफ्फुसाचा कर्करोग

CD

धूम्रपान न करणाऱ्यांनाही फुप्फुसाचा कर्करोग
मुंबईत उपचारासाठी शेकडो रुग्ण, लवकर निदान एकमेव प्रतिबंध
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः फुप्फुसांचा कर्करोग आता केवळ धूम्रपान करणाऱ्यांनाच होतो, असे नाही. २५ सप्टेंबर या दिवशी साजरा होणाऱ्या जागतिक फुप्फुसदिनानिमित्त शहरातील तज्ज्ञांनी इशारा दिला, की वायू प्रदूषण, दुसरीकडे घरी होणारा धूर, रेडॉन वायू आणि आनुवंशिक घटकांमुळे धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही हा आजार झपाट्याने वाढत आहे. दरवर्षी मुंबईत शेकडो फुप्फुसांच्या कर्करोगाचे रुग्ण उपचार घेतात. डॉक्टरांनी लोकांना खबरदारी घेण्याचा, लक्षणे ओळखण्याचा आणि चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे.
सर एच. एन. रिलायन्स रुग्णालयातील प्रिसिजन ऑन्कोलॉजीच्या संचालक डॉ. सेवंती लिमये सांगतात, की पर्यावरणीय प्रदूषण, एस्बेस्टॉस, रेडॉन गॅस, धूम्रपान करणाऱ्यांच्या संपर्कात आल्याने आणि आनुवंशिक बदल फुप्फुसांच्या कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात, असे डॉ. उदीप माहेश्वरी यांनी सांगितले.

देशात दरवर्षी ७५ हजार लोकांना कर्करोग
देशात दरवर्षी सुमारे ७५ हजार लोकांना फुप्फुसांच्या कर्करोगाचे निदान होते, त्यापैकी ३० ते ४० धूम्रपान न करणारे असतात. राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमाच्या आकडेवारीनुसार, देशातील कर्करोगाच्या एकूण मृत्यूंपैकी १० टक्के मृत्यू केवळ फुप्फुसांच्या कर्करोगामुळे होतात.

महिला आणि तरुणांना सर्वाधिक त्रास
डॉ. सचिन त्रिवेदी यांनी सांगितले, की गेल्या दहा वर्षांत, धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः महिला आणि तरुण प्रौढ, धूम्रपान न करताही मोठ्या संख्येने या आजाराने ग्रस्त आहेत. वायू प्रदूषण, धूम्रपानानंतर हवेत मिसळलेला धूर, आनुवंशिक पूर्वस्थिती, हार्मोनल बदल, स्वयंपाकघरातील धुरासारख्या घरातील विषारी पदार्थांचा दीर्घकाळ संपर्क ही यामागील मुख्य कारणे आहेत.

या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
सैफी रुग्णालयातील शस्त्रक्रिया कर्करोगतज्ज्ञ डॉ. मोहम्मद मिठी म्‍हणाले, धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये बहुतेकदा एडेनोकार्सिनोमा विकसित होतो, जो फुप्फुसांच्या बाहेरील भागात विकसित होतो. त्याची लक्षणे अनेकदा वेगळी असतात. छातीत किंवा खांद्यावर दुखणे, आवाजात बदल, मानेवर सूज येणे आणि वजन कमी होणे ही लक्षणे आहेत. खोकल्यामुळे रक्त येणे हे अनेकदा क्षयरोग समजले जाते, ज्यामुळे निदान उशिरा होते.

प्रतिबंधासाठी काय करावे?
वरिष्ठ किरणोत्सर्गतज्ज्ञ डॉ. आदेश पाटील यांनी सुचवले, की घरांमध्ये रेडॉन गॅसची चाचणी, स्वयंपाकघर आणि खोलीतील वायुविजन सुधारणे, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि कामाच्या ठिकाणी धूळ आणि धूर प्रतिबंध करणे आवश्यक आहे. प्रदूषित हवामानात मास्क घालणे आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा इतिहास असल्यास नियमित तपासणी केल्याने जीव वाचू शकतात.

दरवर्षी १०० हून अधिक धूम्रपान न करणाऱ्या फुप्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार केले जातात. सततचा खोकला, छातीत दुखणे, आवाजात बदल किंवा अचानक वजन कमी होणे, यांसारख्या समस्यांना हलक्यात घेऊ नये.
- डॉ. सचिन त्रिवेदी,
प्रमुख, वैद्यकीय कर्करोगशास्‍त्र विभाग
एचसीजी कर्करोग केंद्र

ऑगस्ट २०२४ ते ऑगस्ट २०२५ दरम्यान, आमच्या विविध शाखांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त १,३०० रुग्ण उपचारासाठी आले होते, त्यापैकी आठ टक्के असे रुग्ण होते ज्यांनी कधीही सिगारेट ओढली नव्हती.
- डॉ. उदीप माहेश्वरी,
एमओसी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : संकटाच्या काळात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या सरकार पाठीशी राहणार

Parli Vaijnath : ओबीसी आरक्षण संपले! पोलीस भरतीत मुले लागत नाहीत, या विवंचनेतून ओबीसी बांधवाने संपवलं जीवन

इलेक्ट्रिक SUV चाहत्यांसाठी खुशखबर! Volvo EX30 ची भारतात एन्ट्री; वाचा दमदार फीचर्स आणि धमाकेदार किंमत

Pune News : ससूनमध्ये रुग्णाची उडी मारून संपविले जीवन?

Mahadevi Elephant Return : कोल्हापूर ब्रेकिंग, महादेवी हत्ती परत आणण्यासाठी संयुक्त प्रस्तावाचा आदेश, हाय पॉवर कमिटी सकारात्मक, हत्ती परत येणार का?

SCROLL FOR NEXT