मुंबई

धारावी परिसरातील रस्ते हरवले

CD

धारावी परिसरातील रस्ते हरवले
बेकायदा पार्किंग, कचरा, फेरीवाल्‍यांचे अतिक्रमण; पादचारी त्रस्‍त
धारावी, ता. २५ बातमीदार) : मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या धारावीतील मुख्य रस्ते म्हणजे शहर आणि पश्चिम उपनगराला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र मालवाहू वाहनांची वर्दळ, अवैध पार्किंग, बेकायदा फेरीवाले, रस्त्यांची दुर्दशा, ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंड्या, पदपथाच्या अभावाने रस्त्यावर चालणारे पादचारी यामुळे या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.
मुख्य रस्त्यांप्रमाणेच ९० फुटी रस्ता, धारावी मुख्य रस्ता, संत कक्कया मार्ग, धारावी क्रॉस रोड, कुंभारवाडा रस्ता या अंतर्गत रस्त्यांचीदेखील बिकट अवस्था असल्याने धारावीतील रस्ते नेमके गेले कुठे, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. रस्‍त्‍यावरून चालायलाही जागा शिल्‍लक नसल्‍याने पादचारीदेखील त्रस्‍त आहेत. शहर विकास आराखड्यानुसार (डीपी) धारावीत सुमारे २० किलोमीटरचे रस्त्यांचे जाळे आहे. यातील धारावी मुख्य रस्ता १.४७ किमी, सायन-धारावी रस्ता दोन किमीचा असून, इतर रस्ते याहून छोटे आहेत. लोकसंख्येची घनता लक्षात घेता, धारावीत प्रतिव्यक्ती केवळ ०.०२ मीटर रस्ता उपलब्ध आहे.
वास्तविक धारावीतील सुमारे पाच हजार लघुउद्योगांच्या मालाची ने-आण करणाऱ्या हातगाड्या, छोट्या मालवाहू गाड्या आणि टेम्पो यांच्या वाहतुकीमुळे इथले रस्ते नेहमीच गजबजलेले असतात.
गेल्यावर्षी सायन स्थानकाजवळील वाहतूक पूल नूतनीकरणासाठी बंद केल्याने संत रोहिदास मार्गावरील संपूर्ण वाहतूक लोकमान्य टिळक रुग्णालयाजवळ असलेल्या सुलोचना शेट्टी मार्गावरील वाहतूक पुलावरून वळवण्यात आली आहे. त्यामुळे इथल्या वाहतूक कोंडीत भर पडली असून, प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत २५ ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. माटुंगा लेबर कॅम्पकडे जाणारा रस्ता, पुढे माटुंगा स्थानकाच्या दिशेने जाणारा टाकनदास कटारिया मार्ग, धारावी पोलिस स्थानकाकडे जाणारा ९० फुटी रस्ता आणि टी जंक्शनकडे जाणारा ६० फुटी रोड यांना जोडणाऱ्या आर. डी. भंडारे चौक या मुख्य चौकातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे.

संत कक्कया मार्ग या रस्त्यावर पूर्वी तुरळक वाहने असायची. स्‍थानिकच अधिक या रस्‍त्‍याचा वापर करीत असत. मात्र सायन स्थानकासमोरील वाहतूक पूल गेल्या एक वर्षांपासून बंद झाल्याने धारावीतील अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
- सचिन चौगुले, स्थानिक रहिवासी, दगडी बिल्डिंग

धारावी मुख्य रस्त्यावर २४ तास वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्‍यामुळे आम्‍हा स्थानिकांना दुचाकीवरून जाणे कठीण झाले आहे. त्यातच रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहने उभी करून ठेवली जात असल्याने समस्‍येत अधिकच भर पडली आहे.
- पारी राजन, स्थानिक समाजसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: 'सकाळ'च्या वृत्तमालिकेचा इम्पॅक्ट! अखेर ‘बाबा खान बंगाली’ला अटक, कारशेडमधील सुरक्षा वाढवणार

Ajit Pawar : संकटाच्या काळात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या सरकार पाठीशी राहणार

Parli Vaijnath : ओबीसी आरक्षण संपले! पोलीस भरतीत मुले लागत नाहीत, या विवंचनेतून ओबीसी बांधवाने संपवलं जीवन

इलेक्ट्रिक SUV चाहत्यांसाठी खुशखबर! Volvo EX30 ची भारतात एन्ट्री; वाचा दमदार फीचर्स आणि धमाकेदार किंमत

Pune News : ससूनमध्ये रुग्णाची उडी मारून संपविले जीवन?

SCROLL FOR NEXT