मुंबई

पनवेलकरांचे श्रद्धास्थान

CD

पनवेलकरांचे श्रद्धास्थान
गावदेवी मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास
पनवेल, ता. २५ (बातमीदार) ः शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ग्रामदेवतेच्या मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. अनेक पिढ्यांनी येथील उत्सव, भक्तिभाव अनुभवले आहेत. म्हणूनच गजबजलेल्या रस्त्यांच्या, उंचच उंच इमारतींच्या आणि शहरी गोंगाटात शांतपणे उभी असलेली गावदेवी माता हजारो पनवेलकरांच्या मनातील श्रद्धास्थान आहे.
शारदीय नवरात्रोत्सवाला येथे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पहाटेपासून मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण असते. भोपी मंडळी विधिवत मंदिराची साफसफाई करतात. मंगल स्नान घालतात आणि वातावरणात धूप, दीप, फुलांचा दरवळ दरवळू लागतो. घटस्थापनेच्या वेळी मंदिरात जमलेल्या भाविकांच्या मुखातून जय देवीचा गजर घुमू लागतो. नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. सकाळ-संध्याकाळ आरती, देवीच्या गाणी, ढोल-ताशांचा गजर, टाळमृदंगाबरोबर भाविकांच्या डोळ्यातील भक्तिभावाने मंदिरातील वातावरण पवित्र करतो. पनवेलमधील आगरी, कोळी, कराडी आणि इतर सर्व समाजाची ही गावदेवी आराध्य दैवत आहे.
-------------------------
भावनिक आधार
लग्नसमारंभ, नव्याने घरात प्रवेश, शेतमालाचा पहिला भाग ग्रामदेवतेला अर्पण केले जाते. ही परंपरा आजही जपली जाते. या वर्षीही नवरात्रोत्सवासाठी मंदिर खुले होताच पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले. अनेकांनी देवीच्या चरणी नारळ, फुले, हार वाहिले. गावदेवी मंदिर केवळ पूजा-अर्चेचे ठिकाण नाहीतर पनवेलकरांसाठीचा भावनिक आधार आहे.
------------------------------
सांस्कृतिक महत्त्व कायम
पूर्वी चैत्र महिन्यात गावदेवीची पालखी काढून संपूर्ण पनवेल शहरात मिरवणूक काढली जाते. रस्त्यांवर दिव्यांची रोषणाई, ढोल-ताशांचे निनाद, पालखीच्या स्वागतासाठी उभे राहिलेले नागरिक अशा आठवणी पनवेलकरांमध्ये आजही ताज्या आहेत. मंदिरात यात्रा, भजन-कीर्तन, विविध खेळ, नाटके आणि छोटे-मोठे प्रदर्शन भरत असते; मात्र शहरीकरणामुळे यात्रेचा थाट कमी होत गेला. तरीही मंदिराचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व मात्र आजही कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : संकटाच्या काळात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या सरकार पाठीशी राहणार

Parli Vaijnath : ओबीसी आरक्षण संपले! पोलीस भरतीत मुले लागत नाहीत, या विवंचनेतून ओबीसी बांधवाने संपवलं जीवन

इलेक्ट्रिक SUV चाहत्यांसाठी खुशखबर! Volvo EX30 ची भारतात एन्ट्री; वाचा दमदार फीचर्स आणि धमाकेदार किंमत

Pune News : ससूनमध्ये रुग्णाची उडी मारून संपविले जीवन?

Mahadevi Elephant Return : कोल्हापूर ब्रेकिंग, महादेवी हत्ती परत आणण्यासाठी संयुक्त प्रस्तावाचा आदेश, हाय पॉवर कमिटी सकारात्मक, हत्ती परत येणार का?

SCROLL FOR NEXT