मुंबई

मुरबाडमध्ये सर्प, विंचूदंशात वाढ

CD

मुरबाड, ता. २५ (बातमीदार) : तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्पदंश व विंचूदंशाच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंतच्या हंगामात ६१ नागरिकांना साप चावला, तर १९ जणांना विंचूदंश झाला आहे. या सर्वांवर मुरबाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
सध्या ऊन पडत असल्याने साप व विंचू मोठ्या प्रमाणावर बिळाबाहेर येतात. त्याचबरोबर शेतामध्ये भातकापणीचा हंगाम सुरू झाल्याने नागरिकांनी अधिक सावधानता बाळगावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर बनसोडे यांनी केले आहे. तसेच, विंचू किंवा साप चावल्यास त्वरित शासकीय रुग्णालयात उपचारासाठी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले.
तालुक्यात नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे, दोन ग्रामीण रुग्णालये आणि चार शासकीय दवाखाने कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी सर्पदंश व विंचूदंश उपचारासाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घरगुती उपचार किंवा वैदूंकडील उपचारांवर अवलंबून न राहता त्वरित शासकीय दवाखान्यांचा संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. बनसोडे यांनी केले. जूनमध्ये सर्पदंश १७ आणि विंचूदंश १३ जणांना झाला. जुलैमध्ये १७ जणांना साप व तिघांना विंचू चावला. ऑगस्टमध्ये १३ जणांना साप व एकाला विंचूदंश झाला. तर सप्टेंबरमध्ये आतापर्यंत १४ सर्पदंश आणि एका विंचूदंशाची नोंद झाली आहे.

साप चावला म्हणजे मृत्यू होत नाही. प्रत्येक साप हा विषारी नसतो. साप चावल्यानंतर उपचारासाठी तत्काळ जवळच्या दवाखान्यात जावे. मुरबाड ग्रामीण रुग्णालयात एएएसव्ही हे इंजेक्शन उपलब्ध आहे. या इंजेक्शनसह इतर योग्य उपचार केल्याने रुग्णाचा जीव वाचू शकतो. रुग्णाला साप चावल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करताना चालत आणू नये. त्यामुळे रक्तामध्ये लवकर विष मिसळले जाते. साप चावल्याच्या जखमेवर जास्त घट्ट पट्टी बांधू नये.
-डॉ. संग्राम डांगे, वैद्यकीय अधीक्षक, मुरबाड ग्रामीण रुग्णालय

महिनानिहाय आकडेवारी
सर्पदंश विंचूदंश
जून ... १७ १३
जुलै ... १७ ३
ऑगस्ट ... १३ १
सप्टेंबर (आतापर्यंत) : १४ १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: 'सकाळ'च्या वृत्तमालिकेचा इम्पॅक्ट! अखेर ‘बाबा खान बंगाली’ला अटक, कारशेडमधील सुरक्षा वाढवणार

Ajit Pawar : संकटाच्या काळात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या सरकार पाठीशी राहणार

Parli Vaijnath : ओबीसी आरक्षण संपले! पोलीस भरतीत मुले लागत नाहीत, या विवंचनेतून ओबीसी बांधवाने संपवलं जीवन

इलेक्ट्रिक SUV चाहत्यांसाठी खुशखबर! Volvo EX30 ची भारतात एन्ट्री; वाचा दमदार फीचर्स आणि धमाकेदार किंमत

Pune News : ससूनमध्ये रुग्णाची उडी मारून संपविले जीवन?

SCROLL FOR NEXT