विशेष मुलांच्या प्रगतीचे स्थान
स्वामी ब्रम्हानंद प्रतिष्ठानच्या संस्थापक शिरीष पुजारींचे योगदान
शुभांगी पाटील, तुर्भे
इन्ट्रो ः
मतिमंद मुलांना समाजाच्या सहानुभूतीपूर्ण, उपहासात्मक दृष्टिकोनाचा नेहमी सामना करावा लागतो. त्यांच्या पालकांची होणारी ओढाताण लक्षात घेता असे मूल का जन्माला आले, याचे उत्तर कोणाकडेही नसते. अशा विशेष मुलांसाठी काहीतरी करावे, या उद्देशाने ८०च्या दशकात स्वामी ब्रह्मनंद प्रतिष्ठानच्या स्थापना बेलापूर येथे करण्यात आली. या संस्थेच्या संस्थापक शिरीष पुजारी- गोवेकर यांनी चार विशेष मुलांसह सुरू केलेल्या ज्ञानगंगेचे आता सागरात रूपांतर झाले आहे.
----------------------------
बेलापूर गावातील राम मंदिरातून सुरू झालेले शिरीष पुजारी यांचे वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. त्यांनी दिलेल्या शिक्षणाची शिदोरी सोबत घेऊन अनेक गतिमंद मुले स्वत:च्या पायावर उभी राहिली आहेत. विविध क्षेत्रात काम कमवत आहेत. या मुलांसाठी आणखी काय नवीन करता येईल, याचा पुजारी नव्याने शोध घेत आहेत. मतिमंद मुलांच्या सर्वांगीण विकासाचा वसा घेऊन पुढे चालल्या आहेत. आपल्या मुलामध्ये असलेले व्यंग स्वीकारण्याची तयारी नसलेल्या काळात त्यांनी मुलांच्या घरोघरी जाऊन शिक्षण द्यायला सुरुवात केली. कोणत्याही प्रकारची सुविधा नसताना १९८९ मध्ये बेलापूर गावातील राम मंदिरातून सुरू झालेले त्यांचे शिक्षणाचे काम आता एक वेगळ्या टप्प्यावर आले आहे. मुंबईहून बेलापूरला येण्यासाठी वाहतूक व्यवस्था नसताना विविध अडचणींवर मात करीत आज असंख्य मुलांना समाजाच्या योग्य प्रवाहात आणण्याचे काम करीत आहेत. स्वामी ब्रम्हानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेलापूरमध्ये दिशा आणि फाल्गुनी असे दोन विभाग सुरू केले आहेत. तर उरणमध्ये सी बर्ड ही विभाग सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी १६० विशेष मुले शिक्षण घेत आहेत. त्यात बेलापूरमध्ये ५६, खारघरमध्ये ४७ तर उरणमध्ये ४० मुलांना प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी शिरीष यांच्यासोबत ४४ कर्मचारी असून ५० मुलांना शासनाची शिष्यवृत्ती तर इतर मुलांसाठी आर्थिक मदत गोळा करावी लागते.
-----------------------------------------------
खडतर प्रवास
सधन कुटुंबात जन्माला आलेल्या शिरीष यांनी महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण केले. महाविद्यालयात जात असताना त्या दररोज मुंबईतील दिव्यांग व्यक्ती, लहान मुलांना पाहत असतात. यातूनच त्यांचे प्रश्न, समस्या याची अगतिकता ही त्यांनी जवळून पहिली. त्यामुळे विशेष व्यक्ती, मुलांसाठी काही तरी करावे, असे त्यांनी ठरवले. त्यानंतर बीएडचे शिक्षण पूर्ण केले. विशेष मुलांच्या एका शाळेत त्यांनी आठ वर्षे काम केले. ऐंशीच्या दशकात नवी मुंबईतील बेलापूरमध्ये दिव्यांग मुलांना शिक्षण देण्याचे काम सुरू केले.
--------------------------------------
स्वयंम रोजगाराचे धडे
स्वामी ब्रह्मनंद प्रतिष्ठानमध्ये साडेचार वर्षांपुढील मुलांना प्रवेश दिला जातो. प्रत्येक वर्गात आठ किंवा दहा मुले असतात. त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षण दिले जाते. मुलाच्या समजून घेण्याच्या क्षमतेनुसार विविध कलाकृती शिकवल्या जातात. ज्वेलरी मेकिंग, राख्या बनवणे, दिव्यांची सजावट, कंदील बनवणे. कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या सर्व वस्तूंची प्रदर्शनी मांडताना विक्रीतून आलेला मोबदला मुलांना दिला जातो. आपण कुणावर ओझे नसल्याची भावना रुजवण्याचे काम मुलांमध्ये केले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.