मुंबई

नवी मुंबईतील अपंगांचे स्टॉल वापराविना

CD

अपंगांच्या रोजगारावर गदा
नवी मुंबई पालिकेचे स्टॉल वापराविना, उदरनिर्वाहाचा प्रश्न
नेरूळ, ता. २५ (बातमीदार)ः समाजातील निराधार वृद्ध, अंध, अपंग, मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, अनाथ बालके, निराधार विधवा अशा विविध स्तरांवरील नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सरकार राज्यातील नागरिकांना आर्थिक सहाय्य करीत असते. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी स्टॉल देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी स्टॉल सुरू झाले नसल्याने त्यावर गर्दुल्ल्यांनी कब्जा केला आहे, तर काही स्टॉल धूळखात पडून आहेत.
राज्यातील दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. अपंग, मूकबधिर, मानसिक आजाराने ग्रस्त अशा नागरिकांच्या सहाय्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाते. परंतु अनेकांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचली नसल्यामुळे ते योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दिव्यांगांच्या सक्षमीकरणाकरिता स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्टॉल देण्याचे नियोजन करण्यात आले होते. वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृह येथे २०२३मध्ये मोठा गाजावाजा करीत महापालिकेकडून ३३० ठिकाणी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व स्टॉल सोडतधारकांना वितरित झाले आहेत. मात्र अनेक ठिकाणी स्टॉल सुरू झाले नसल्याने गर्दुल्ल्यांनी त्याचा कब्जा केला आहे, तर अनेक स्टॉल धूळखात पडून आहेत. याबाबत नवी मुंबई पालिकेच्या मालमत्ता विभागाचे उपायुक्त भागवत डोईफोडे यांच्याकडे विचारणा केली असता, या प्रकरणामध्ये परिमंडळ एक, परिमंडळ दोनच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले.
--------------------------------------------
व्यवसायातील अडचणी
- नेरूळ सेक्टर ८ येथील एल मार्केटमध्ये देण्यात आलेले अपंगांचे काही स्टॉलच सुरू आहेत. जुईनगर येथे दिव्यांगांना देण्यात आलेल्या स्टॉल अनेक दिवसांपासून बंद आहेत. सानपाडा विभागातील सेक्टर ४ येथील दिव्यांग स्टॉल कचराकुंडीशेजारी अडगळीच्या ठिकाणी किंवा जिथे कोणताही व्यवसाय चालू शकणार नाही, अशा जागी ठेवण्यात आले आहेत.
- तुर्भे स्टोअर, वाशी सेक्टर-१७, महाराजा मार्केटसारख्या भागांत अतिक्रमणामुळे मनपाला स्टॉल उभारणी करताना अडचणींचा सामना करावा लागला. शौचालयांसारख्या मूलभूत सुविधा नसल्याने अनेक दिव्यांगांना स्टॉल मिळूनही व्यवसाय सुरू करता आलेला नाही.
-------------------------------
गर्दुल्ल्यांचा वावर
घणसोली सेक्टर ४ मधील ३८ स्टॉलपैकी फक्त एक दोन स्टॉल सुरू आहेत. तर उर्वरित बंद असून, त्यात घाणीचे साम्राज्य आहे. अनेक स्टॉल मोडकळीस आले असून, रात्रीच्या वेळी मद्यपान, अमली पदार्थांचा वापर, दारूच्या बाटल्या, गुटख्यासारख्या पाकिटांचा पसारा असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या ठिकाणी व्यवसाय सुरू केल्यास खर्चही सुटणार नाही. त्यामुळे आम्हाला दुसऱ्या ठिकाणी स्टॉल स्थलांतरित करून द्या, अशी मागणी अपंग सेना ऑफ नवी मुंबई अध्यक्ष मारुती लांडे यांनी केली आहे.
-----------------------------------
नवी मुंबई महापालिकेने दिव्यांग बांधवांसाठी स्टॉलचे वितरण केले असले तरी निश्चित केलेली ठिकाणे चुकीची आहेत. कचराकुंडीशेजारी, अडगळीच्या ठिकाणी किंवा कोणताही व्यवसाय चालू शकणार नाही, अशा जागी व्यवसाय करणे कठीण आहे.
- नीलेश कचरे, सामाजिक कार्यकर्ते, नवी मुंबई
--------------------------------
दिव्यांगांना वितरित केलेले स्टॉल अडगळीच्या ठिकाणी पडलेले आहेत. त्यांचा वापर करणे शक्य नाही. हे स्टॉल इतरांना वापरण्याकरिता द्यावेत, जेणेकरून थोडेफार भांडवल मिळवता येईल अन्यथा महापालिकेचा हा उपक्रम वाया जाईल.
- मारुती लांडे, अध्यक्ष, अपंग सेना नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : संकटाच्या काळात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या सरकार पाठीशी राहणार

Parli Vaijnath : ओबीसी आरक्षण संपले! पोलीस भरतीत मुले लागत नाहीत, या विवंचनेतून ओबीसी बांधवाने संपवलं जीवन

इलेक्ट्रिक SUV चाहत्यांसाठी खुशखबर! Volvo EX30 ची भारतात एन्ट्री; वाचा दमदार फीचर्स आणि धमाकेदार किंमत

Pune News : ससूनमध्ये रुग्णाची उडी मारून संपविले जीवन?

Mahadevi Elephant Return : कोल्हापूर ब्रेकिंग, महादेवी हत्ती परत आणण्यासाठी संयुक्त प्रस्तावाचा आदेश, हाय पॉवर कमिटी सकारात्मक, हत्ती परत येणार का?

SCROLL FOR NEXT