मुंबई

थोडक्‍यात नवी मुंबई

CD

पालिकेची सखोल स्वच्छता मोहीम
तुर्भे, ता. २५ (बातमीदार) ः स्वच्छ भारत मिशनच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक दिवस, एक साथ, एक तास’ ही सखोल स्वच्छता मोहीम आठही विभाग कार्यालय क्षेत्रात ठिकठिकाणी लोकसहभागातून राबविण्यात आली. पारसिक हिल, सीबीडी बेलापूर येथे अपोलो हॉस्पिटलपासून टेकडीच्या माथ्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह ७५० हून अधिक अधिकारी, कर्मचारी, स्वच्छताकर्मी तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, मॉर्निंग वॉकर्स, स्वच्छताप्रेमी नागरिक, विविध महाविद्यालयांचे एनएसएस विद्यार्थी यांनी उत्साहाने सहभागी होत ही मोहीम यशस्वी केली. त्याचप्रमाणे नवी मुंबई शहरात महापालिका व खासगी शाळा, महाविद्यालये, रुग्णालय, मार्केट, कार्यालय, उद्योगसमूह, विविध संस्था, सोसायट्या तसेच सर्व विभाग कार्यालय क्षेत्रातील सार्वजनिक जागा अशा विविध ठिकाणी व्यापक प्रमाणात लोकसहभागातून स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या. तसेच आठही विभाग कार्यालय क्षेत्रात विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या मोहिमांमध्ये दहा हजारहून अधिक अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे पालिकेच्या ८० व खासगीमधील ३०० हून अधिक शाळांतील दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेची रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे आणि खासगी रुग्णालये या ठिकाणी डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ आणि स्वच्छताकर्मी अशा पाच हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.
................
सीवूड्स येथे रस्ते सुरक्षा जागृती कार्यशाळा
नेरूळ (बातमीदार) ः वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संस्कार फाउंडेशन आणि सारखी सुरक्षा सेवा संस्था यांच्या विद्यमाने ज्ञानदीप सेवा मंडळाचे कनिष्ठ महाविद्यालय, सीवूड्स येथे रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यशाळा पार पडली. याचे आयोजन ठाकरे सेनेचे उपशहरप्रमुख समीर बागवान यांनी केले होते. वाहनांचा दहशतवाद विषयावर विनय मोरे यांनी मार्गदर्शन केले. नियमभंग, मोबाईलचा वापर यामुळे होणारे अपघात प्रेझेंटेशनद्वारे समजावले. पोलिस निरीक्षक मोहिनी लोखंडे, ज्ञानदीप सेवा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुमित्र कडू, मिलिंद भोईर, सीमा संकपाळ, अर्चना बागवान यांची उपस्थिती लाभली. विशेष आकर्षण म्हणून पाच विद्यार्थ्यांना हेल्मेट बक्षीस देण्यात आले. तसेच इयत्ता नववीची विद्यार्थिनी हर्षाली भूषण भोईर हिचा अंडर १७ बॉक्सिंग क्षेत्रातील यशाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी प्राचार्य पी. पी. पाटील, समस्त प्राध्यापक वर्ग व संस्थेचे कर्मचारी दत्ता साबळे, केदार बनसोडे, सादिक बागवान, शिवम ठाकूर हे उपस्थित होते.
..................
मालकीचे भूखंड कुकशेतकरांना देण्याची मागणी
नेरूळ (बातमीदार) ः कुकशेत गावातील ग्रामस्थांना जुन्या गावातील घराच्या मोबदल्यात पुनर्वसन प्रक्रियेत मिळालेला भूखंड भाडेतत्त्वावर न देता कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्यात यावा, या मागणीसाठी राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला एमआयडीसी, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, पालिका अधिकारी यांची उपस्थिती होती. तसेच खासदार विष्णू सवरा, कुकशेत गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. कृषी ग्रामस्थांची मागणी रास्त असल्याने भाडेकरार न करता कायमस्वरूपी मालकी हक्क देण्याबाबत मंत्र्यांनी संबंधित निर्देश दिले. एका बाजूला नवी मुंबईतील ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्डवाटप राबविले जाते. तसेच सिडको क्षेत्र फ्री होल प्रक्रिया शासन स्वीकारते. तर मग कुकशेत गाव जे महसुली गाव होते, त्या ग्रामस्थांवर भाडेकरार लाटून अन्याय का केला जातोय, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
...........
सेवाभावी १०० उपक्रमांचा पंधरवड्यात सामाजिक उपक्रम
नवी मुंबई ः वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित अभीष्टचिंतन पंधरवड्यातील आठव्या दिवशी वाशी विभागात विविध लोकोपयोगी आणि सेवाभावी उपक्रम घेण्यात आले. यामध्ये वाशी विभागातील वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचारी, ईटीसी अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांना खाऊवाटप, तसेच केंद्रातील शिक्षक, मदतनीस, सफाई कर्मचारी व सुरक्षा रक्षकांचा सन्मान करण्यात आला. माजी नगरसेविका फशीबाई भगत, निशांत भगत व संदीप भगत यांच्या हस्ते हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. याचसोबत वाशीतील महाराष्ट्रीयन संस्कृती व लोककला जपणाऱ्या वासुदेव व पिंगळा मंडळींचा सन्मानदेखील करण्यात आला. या मंडळींच्या भक्ती व सांस्कृतिक योगदानामुळे वाशीमध्ये नवनवीन प्रेरणा निर्माण झाली आहे. या वेळी स्थानिक मच्छीमारबांधवांसाठीच्या न्यायासाठी आंदोलनाचा आवाज उठवला गेला. वाशी खाडीवर उभारण्यात आलेल्या चौथ्या पुलामुळे मच्छीमारबांधवांचे जीवन व रोजगार प्रभावित झाले असून, त्यांचे नुकसानभरपाईसह उचित पुनर्वसन शासनाकडून करण्याची मागणीसंबंधित मंत्री व विभागीय प्रधान सचिव यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांना भेटून निशांत भगत यांनी नवी मुंबईच्या संपादित ९५ गावांच्या श्रद्धास्थान असलेल्या मंदिराच्या जागा संबंधित गावकी किंवा कार्यरत मंदिर संस्था यांच्या नावे करण्यासाठी निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.
........
मनसेकडून नागरी कामांचा लोकार्पण सोहळा
खारघर (बातमीदार) : मनसेचे कार्यकर्ते गणेश बनकर यांनी जनतेच्या हितासाठी केलेली नागरी कामे आणि प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. खारघरमधील मनसेचे माजी शहर अध्यक्ष गणेश बनकर हे अनेक वर्षांपासून पक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या हितासाठी काम करीत आहे. खारघर टोलनाका, स्वच्छतागृहाची मागणी, पादचारी पूल, रस्ते, पाणी, सांडपाणी समस्या, निवारा शेड, दिव्यांग व्यक्तीला स्टॉल देण्यात यावे, अशा अनेक समस्या शासनदरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा प्रकारे काम करताना विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला. या वेळी मनसेचे कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
.......
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप
उरण (वार्ताहर) ः केळ्याचे माल अभिनव सेवा सहकारी संस्था, चिरनेर यांच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे. शारदा नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून बुधवारी (ता. २४) अतिदुर्गम भागातील केळाचा माल या आदिवासीवाडीवरील महिलांना सामाजिक कार्यकर्ते अनंत नारंगीकर यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत साड्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामदैवत, आदिशक्तीचा जागर सोहळा तथा शारदीय नवरात्रोत्सव शहर तसेच ग्रामीण भागात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे. यावर्षी शारदीय नवरात्रोत्सव हा सोमवारी आल्याने यंदाही नवरात्रोत्सव मंडळाने शहरात, गाव परिसरात घटस्थापनेच्या मुहूर्तावर दुर्गादेवी, महिषासुरमर्दिनीची मोठ्या भक्तिभावाने पूजाअर्चा करून प्राणप्रतिष्ठा केली आहे. या मुहूर्ताचे औचित्य साधून चिरनेर केळाचा माल या अतिदुर्गम भागातील आदिवासी महिलांसाठी साड्यांचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अनंत नारंगीकर, वंदना नारंगीकर यांच्या कुटुंबीयांनी हाती घेतला. या वेळी केळ्याचे माल अभिनव सेवा सहकारी संस्थचे पदाधिकारी दत्ता कातकरी, अशोक कातकरी, सुरेश कातकरी, रोहित कातकरी, श्रीकांत कातकरी, राम कातकरी, राम कातकरी यांच्या उपस्थितीत कविता अशोक कातकरी, वैशाली गुरुनाथ कातकरी, कीर्ती रोहित कातकरी, बेबी रामा कातकरी, अमिषा अश्विन कातकरी, देवकी दत्ता कातकरी, लता दशरथ कातकरी, गुलाब सुरेश कातकरी, रूपाली अजय कातकरीसह इतर आदिवासीबांधव, महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : संकटाच्या काळात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या सरकार पाठीशी राहणार

Parli Vaijnath : ओबीसी आरक्षण संपले! पोलीस भरतीत मुले लागत नाहीत, या विवंचनेतून ओबीसी बांधवाने संपवलं जीवन

इलेक्ट्रिक SUV चाहत्यांसाठी खुशखबर! Volvo EX30 ची भारतात एन्ट्री; वाचा दमदार फीचर्स आणि धमाकेदार किंमत

Pune News : ससूनमध्ये रुग्णाची उडी मारून संपविले जीवन?

Mahadevi Elephant Return : कोल्हापूर ब्रेकिंग, महादेवी हत्ती परत आणण्यासाठी संयुक्त प्रस्तावाचा आदेश, हाय पॉवर कमिटी सकारात्मक, हत्ती परत येणार का?

SCROLL FOR NEXT