मुंबई

कचरा गाड्यांची दयनीय अवस्था

CD

कचरा गाड्यांची दयनीय अवस्था
बदलापूरकर त्रस्त; गाड्यांना नंबर प्लेट नाही
बदलापूर, ता. २५ (बातमीदार) : कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. शहरात आजही अशा गाड्या कचरा संकलनासाठी वापरल्या जात आहेत, ज्या अक्षरशः भंगारात टाकाव्यात इतक्या मोडकळीस आलेल्या आहेत. यापैकी अनेक गाड्यांवर नंबर प्लेटही नाही. अशा गाड्यांत क्षमतेपेक्षा अधिक कचरा भरून शहरभर संकलनासाठी फिरवले जात असल्याने नागरिक आणि इतर वाहनचालक यांना त्रास सहन करावा लागत आहे.

गाड्यांतून गळणारे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर किंवा शेजारील वाहनांवर पडते. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा त्रास होतो. पावसाळ्यात तर ही परिस्थिती अधिक गंभीर बनते. गतिरोधक किंवा उतार-चढावाच्या ठिकाणी या ओव्हरलोडेड गाड्या पलटण्याचा धोकादेखील कायम असतो. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. नागरिक यामुळे भीतीच्या सावटाखाली प्रवास करत आहेत. पालिकेने कचरा संकलनाचे काम ठेकेदारामार्फत दिले असले तरी वाहनांची देखभाल आणि सुरक्षेची जबाबदारी दुर्लक्षित झालेली दिसते. या गाड्यांमध्ये योग्य झाकणही नसते, त्यामुळे उघड्यावरून कचरा वाहून नेला जातो. यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि रोगराई पसरण्याचा धोका वाढतो.

आरोग्याचा प्रश्न
शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे, मात्र अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून स्वच्छतेची योग्य व्यवस्था केली जात नाही, हे चिंतेचे कारण आहे. बदलापूरमधील अनेक भागांमध्ये कचरा वेळेवर उचलला जात नाही, त्यातच अशा अपुऱ्या आणि धोकादायक साधन सामग्रीचा वापर नागरिकांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला धक्का देणारा आहे. बदलापूरकरांनी तत्काळ नवीन, सुरक्षित व सुसज्ज कचरा संकलन वाहने उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train AI Fake Tickets : मुंबई लोकल ट्रेनसाठी ‘AI’द्वारे बनावट तिकिटे तयार करणाऱ्यांना होवू शकते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Crime: डोळे काढले, शरीरावर १५० जखमा अन्...; १४ वर्षीय प्रेयसीसोबत भयंकर कृत्य, ४८ वर्षीय प्रियकराने क्रूरतेच्या मर्यादा ओलांडल्या

IND vs SA: 'ऋतुराजला एका अपयशामुळे टीम इंडियातून काढू नका, मी हात जोडले...', माजी क्रिकेटरची विनंती

Army Jawan : देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानाचा यथोचित सन्मान; सैनिकाच्या 'त्या' कृतीने जिंकली मने, असं काय केलं?

PMC Hoarding Fee : होर्डिंग शुल्क दरवाढीचा ठराव शासनाकडून रद्द; महापालिकेला मोठा झटका!

SCROLL FOR NEXT