मुंबई

मराठमोळा वेष परिधान करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे

CD

मराठमोळा वेष परिधान करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे
विक्रोळीत भाजपकडून भव्य मराठी दांडिया महोत्सव
घाटकोपर, ता. २५ (बातमीदार) ः राज्यात नवरात्रोत्सवाची धूम सुरू असून, देवीच्या जागरणासोबतच गरबा आणि दांडियाच्या रंगीबेरंगी उत्सवामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विक्रोळी (पूर्व) कन्नमवारनगर येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर भाजपने यंदा भव्य मराठी दांडिया महोत्सव आयोजित केला आहे.
मराठमोळा वेष परिधान करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. यामध्ये आयफोनसारखे मोठे बक्षीसही देण्यात येणार असल्याचे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष वीरेंद्र ठाकूर यांनी सांगितले.
२७ सप्टेंबर २०२५ ते १ ऑक्टोबर २०२५ पर्यंत छत्रपती संभाजी महाराज मैदान येथे सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत दांडिया महोत्‍सव होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून काळाचौकी येथे मोठ्या उत्साहात साजरा होणारा हा महोत्सव यंदा प्रथमच विक्रोळीत होणार आहे. भाजप आमदार मिहिर कोटेचा यांच्या पुढाकाराने आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा सोहळा पारंपरिकतेचा आणि आधुनिकतेचा संगम ठरणार आहे.
या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते यांचे सादरीकरण.


मराठी दांडिया महोत्सवात महिला आणि पुरुषांना मराठमोळी वेशभूषा साकारायची आहे. दररोज होणाऱ्या या दांडियात तीन आयफोन जिंकण्याची संधी असणार आहे. मराठी संस्कृती टिकावी आणि तिचे जतन व्हावे, यासाठी हा महोत्सव भरवण्यात आला आहे.
- वीरेंद्र ठाकूर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: 'सकाळ'च्या वृत्तमालिकेचा इम्पॅक्ट! अखेर ‘बाबा खान बंगाली’ला अटक, कारशेडमधील सुरक्षा वाढवणार

Ajit Pawar : संकटाच्या काळात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या सरकार पाठीशी राहणार

Parli Vaijnath : ओबीसी आरक्षण संपले! पोलीस भरतीत मुले लागत नाहीत, या विवंचनेतून ओबीसी बांधवाने संपवलं जीवन

इलेक्ट्रिक SUV चाहत्यांसाठी खुशखबर! Volvo EX30 ची भारतात एन्ट्री; वाचा दमदार फीचर्स आणि धमाकेदार किंमत

Pune News : ससूनमध्ये रुग्णाची उडी मारून संपविले जीवन?

SCROLL FOR NEXT