मुंबई

चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतीदिन उत्साहात

CD

चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन उत्साहात
बंदुकीच्या २१ फेरी झाडून हुतात्म्यांना शासकीय सलामी
उरण, ता. २५ (वार्ताहर) ः चिरनेर येथे ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध झालेल्या जंगल सत्याग्रहाचा ९५वा स्मृतिदिन आज मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी पोलिस यंत्रणेकडून बंदुकीच्या २१ फेरी झाडून सत्याग्रहातील हुतात्म्यांना शासकीय सलामी देण्यात आली.
इंग्रज राजसत्तेविरुद्ध २५ सप्टेंबर १९३० रोजी चिरनेर येथील अक्कादेवीच्या रानमाळावर चिरनेर पंचक्रोशीतील जनतेने जंगल सत्याग्रह केला होता. या स्वातंत्र्य समरात आठ सत्याग्रहींना हौतात्म्य प्राप्त झाले होते, तर अनेक सत्याग्रहींना अटक झाली होती. या सत्याग्रहात चिरनेर गावातील धाकू गवत्या फोफेरकर व नाग्या महादू कातकरी, आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), रामा बामा कोळी (मोठी जुई), हसुराम बुधाजी घरत (खोपटा), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), आनंदा माया पाटील (धाकटी जुई) या आठ सत्याग्रहींनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. त्यांच्या हौताम्याला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी चिरनेर येथील हुतात्मा स्मारकासमोर चिरनेर पंचक्रोशीतील जनता एकवटते. त्‍यानुसार आज जंगल सत्याग्रहाच्या पवित्र स्मृतिदिनानिमित्त दुपारी १२ वाजता हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी पोलिस यंत्रणेकडून बंदुकीच्या २१ फैरी झाडून हुतात्म्यांना शासकीय सलामी देण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून हुतात्म्ये व सत्याग्रहींच्या वारसांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
.................
चिरनेरच्या विकासासाठी जेएनपीए प्रशासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी याप्रसंगी सांगितले. ते पुढे म्हणाले, की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले जाईल, असे ही या वेळी नमूद केले. चिरनेर ग्रामपंचायत व रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उद्योजक पी. पी. खारपाटील, जे. एम म्हात्रे, उरणचे तहसीलदार उद्धव कदम, चिरनेरचे सरपंच भास्कर मोकल आदी मान्यवर तसेच मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : संकटाच्या काळात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या सरकार पाठीशी राहणार

Parli Vaijnath : ओबीसी आरक्षण संपले! पोलीस भरतीत मुले लागत नाहीत, या विवंचनेतून ओबीसी बांधवाने संपवलं जीवन

इलेक्ट्रिक SUV चाहत्यांसाठी खुशखबर! Volvo EX30 ची भारतात एन्ट्री; वाचा दमदार फीचर्स आणि धमाकेदार किंमत

Pune News : ससूनमध्ये रुग्णाची उडी मारून संपविले जीवन?

Mahadevi Elephant Return : कोल्हापूर ब्रेकिंग, महादेवी हत्ती परत आणण्यासाठी संयुक्त प्रस्तावाचा आदेश, हाय पॉवर कमिटी सकारात्मक, हत्ती परत येणार का?

SCROLL FOR NEXT