मुंबई

‘बाबा खान बंगाली’ला अटक

CD

‘सकाळ’च्या वृत्तमालिकेचा इम्पॅक्ट

‘बाबा खान बंगाली’ला अटक

कठोर कारवाई करण्याचे आदेश ; कारशेडमधील सुरक्षा वाढवणार

 नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : तंत्र-मंत्र, काळ्या जादूच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या तथाकथित बंगाली बाबांचा गोरखधंदा ‘सकाळ’ने वृत्तमालिकेतून उघडकीस आणला आहे. यानंतर रेल्वे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ‘बाबा खान बंगाली’च्या नावाने फसवणूक करणाऱ्या अब्दुल समद मोहम्मद इरशाद या तरुणाला  अटक केली आहे. फसवणुकीच्या या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने सर्व  आरपीएफच्या ठाण्यांना दिले आहेत. 

प्रेमातील अपयश, कौटुंबिक कलह, वशीकरण, लग्न जमत नाही ते  रेल्वे गाड्या वेळेवर धावण्यासाठी हमखास उपाययोजना करण्याचा दावा करणाऱ्या बंगाली बाबांच्या जाहिरातींनी आजपर्यंत शेकडो प्रवाशांची फसवणूक केली. ‘सकाळ’ने या बंगाली बाबांची कुंडलीच बाहेर काढली. ‘सकाळच्या वृत्तमालिकेनंतर खडबडून जागे झालेल्या आरपीएफने सापळा लावून एका बंगाली बाबाला पकडले आहे. त्याचे नाव अब्दुल समद मोहम्मद इरशाद असून, तो उत्तर प्रदेशातील मेरठ येथील रहिवासी आहे. २२ दिवसांपूर्वी तो मुंबईत आला आहे. माहीम (पूर्व) येथील झोपडपट्टीत खोली भाड्याने घेऊन त्याने स्वतःला ‘बाबा खान बंगाली’ नावाने धंदा सुरू केला. शेकडो पोस्टर छापून लोकलच्या डब्यांमध्ये चिकटवले आणि प्रवाशांची फसवणूक सुरू केली.

सीसीटीव्हीला हुलकावणी फसली
वांद्रे स्थानकाच्या फलाट क्रमांक ७वर उभा असताना हा आराेपी तरुण सीसीटीव्हीत कैद झाला. या चित्रीकरणाच्या आधारे रेल्वे पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त (मुंबई सेंट्रल) यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे आरपीएफ पोस्टच्या पथकाने ही कारवाई केली. या छाप्यात आरोपीकडून  शेकडो पोस्टर जप्त करण्यात आले आहेत.

सतर्कतेचा इशारा
कारवाईनंतर आरपीएफने संपूर्ण उपनगरी रेल्वेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. इतर ठिकाणीही अशा प्रकारचा गोरखधंदा पसरल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्व आरपीएफ ठाण्याला अशा बाबांवर बारकाईने  लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार  रेल्वे पोलिसांनी या बंगाली बाबांचा  मागोवा घेण्याचे काम सुरू केले असून, अशा भाेंदूंची धरपकड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे पोस्टर कारशेडमध्ये लावण्यात येत असल्यामुळे तेथे अधिक लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारत - पाकिस्तान तिसऱ्यांदा आमने-सामने येणार, फायनलमध्ये महामुकाबला रंगणार! बांगलादेशचे आव्हान संपले

Solapur Flood : टिंगल लावली काय? तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत, पूरग्रस्त शेतकरी थेट मंत्र्यांच्या गाडीसमोरच आडवे पडले

Khedkar Family: अपहरण प्रकरणात खेडकर कुटुंब अडचणीत; फरार दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआऊट नोटीस जारी

Aadul News : सरकट आर्थिक मदत देवून कर्जमाफी करावी; उद्धव ठाकरे

ग्रामविकास मंत्र्यांची मोठी घोषणा! पूरग्रस्तांना सुईसुद्धा विकत घ्यावी लागणार नाही, सरकारकडून मिळेल धान्य, कपडे, दिवाळीचे साहित्य

SCROLL FOR NEXT