धारावी पुनर्वसन इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा
उच्च न्यायालयाचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः धारावी पुनर्वसन इमारतीतील रहिवाशांनी त्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मातीची झीज होत असल्याने धोका निर्माण झाल्याचा दावा याचिकेत केला आहे. त्याची दाखल घेऊन न्यायालयाने या इमारतींचे स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले.
न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरती साठे यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी झाली. त्या वेळी याचिकाकर्त्यांनी याचिकेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची गंभीर दखल न्यायालयाने घेतली आणि इमारतीच्या संरचनात्मक स्थिरतेबद्दल चिंता व्यक्त करून तातडीने तपासणी करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. आर्किटेक्ट्स शेटगिरी अँड असोसिएट्स आणि जीएम आर्क प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश असलेल्या समितीने या जागेची तपासणी करावी आणि जमिनीची धूप, झीज होते आहे का, त्याबाबतच्या आणि नुकसानीचा अहवाल सादर करावा, असे आदेशही दिले. दुसरीकडे, एसआरएच्या कार्यकारी अभियंत्यांना १ ऑक्टोबरला तपासणीदरम्यान उपस्थित राहण्याचे आदेश देऊन न्यायालयाने सुनावणी ७ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली. सायन-वांद्रे लिंक रोडवर असलेल्या १५ मजली कामराजनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या शेजारच्या भूखंडावर २१ मजली फ्री-सेल टॉवरचे बांधकाम विकसकांनी सुरू केल्यानंतर ही समस्या सुरू झाल्याचे संस्थेतील रहिवाशांनी याचिकेत म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.