वैद्यकीयच्या दुसऱ्या फेरीत एमबीबीएस, बीडीएसचे मुबलक प्रवेश
मुंबई, ता. २५ ः राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत एमबीबीएस आणि बीडीएसच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित केला. या फेरीत दोन्ही अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिल्याने एमबीबीएसच्या ४६ आणि बीडीएसच्या २२ जागा रिक्त राहिल्या, अशी माहिती सीईटी सेलने जाहीर केलेल्या आकडेवारीतून देण्यात आली आहे.
वैद्यकीयच्या एमबीबीएसच्या शासकीय, खासगी एकूण ६५ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या फेरीपर्यंत प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या आठ हजार ३०५ जागांपैकी आठ हजार २५९ जागांवर विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. तर बीडीएसच्या शासकीय आणि खासगीतील एकूण ३० महाविद्यालयातील दोन हजार ७१८ जागांपैकी दोन हजार ६९६ जागांवर प्रवेश निश्चित केले असून केवळ २२ जागा रिक्त राहिल्या आहेत.
वैद्यकीयच्या पहिल्या प्रवेश फेरीदम्यान एमबीबीएस अभ्यासक्रमात राज्य कोट्यातील आठ हजार १३८ जागांपैकी आठ हजार १०६ जागांवर प्रवेशाची संधी या यादीत मिळाली होती. त्यापैकी सहा हजार ८४८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तर बीडीएस अभ्यासक्रमासाठी दोन हजार ७२५ जागांपैकी दोन हजार ७०९ जागा अलॉट झाल्या होत्या. त्यापैकी ९६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला होता. दुसरीकडे शासकीय महाविद्यालयांमध्ये ३२५ जागांपैकी ३११ जागा अलॉट झाल्या होत्या, तर खासगी दंत महाविद्यालयांत दोन हजार ३९८ जागा अलॉट झाल्या होत्या. आता दुसऱ्या फेरीच्या प्रवेशच्या आकडेवारीनंतर या फेरीत उपलब्ध असलेल्या बहुतांश जागांवर प्रवेश झाले असून केवळ नाममात्र जागा रिक्त राहिल्या आहेत.
--
दुसऱ्या यादीतील प्रवेशाची आकडेवारी एमबीबीएस
महाविद्यालय अभ्यासक्रम उपलब्ध जागा झालेले प्रवेश रिक्त जागा
शासकीय - ४२ एमबीबीएस ४,९३६ ४,८९० ४६
खासगी - २३ एमबीबीएस ३,३६९ ३,३६९ ०
एकूण - ६५ एमबीबीएस ८,३०५ ८,२५९ ४६
दुसऱ्या यादीतील बीडीएसचे प्रवेश
शासकीय - ५ बीडीएस ३१८ ३१० ८
खासगी - २५ बीडीएस २,४०० २,३८६ १४
एकूण - ३० बीडीएस २,७१८ २,६९६ २२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.