टाटा पाॅवरचा हरित ऊर्जा निर्मितीवर भर
सुझलाॅनकडून ८३८ मेगावॉट क्षमतेचे पवन ऊर्जा टर्बाइन खरेदी करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः टाटा पाॅवरने हरित ऊर्जा निर्मितीवर भर दिला जात आहे. त्यानुसार भविष्यात पवन ऊर्जा निर्मिती क्षमता वाढवता यावी, म्हणून टाटा पाॅवरची उपकंपनी असलेल्या टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (टीपीआरईएल)ने ८३८ मेगावॉट क्षमतेच्या पवन टर्बाइन जनरेटरच्या पुरवठ्यासाठी सुझलॉन कंपनीसोबत करार केला आहे. हे टर्बाइन पुढील काळात उपलब्ध होणार असून ती ‘टीपीआरईएल’च्या विविध राज्यांमध्ये असलेल्या प्रकल्पांना पुरवली जातील. केंद्र सरकारकडून हरित ऊर्जा निर्मितीवर भर दिला जात असून २०३० पर्यंत ५०० गिगावॉटचे सौर, पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामध्ये टीपीआरईएल महत्त्वाची भूमिका बजावत असून सध्या सुमारे एक गिगावाॅटपेक्षा अधिक क्षमतेच्या पवन ऊर्जा प्रकल्पातून वीजनिर्मिती होत आहे, तर सुमारे तीन गिगावॉटपेक्षा जास्त क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यातील पवन ऊर्जा टर्बाइनची गरज पूर्ण करण्यासाठी सुझलाॅन कंपनीसोबत करार केल्याचे टीपीआरईएलने स्पष्ट केले आहे. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात प्रदूषणरहित वीज उपलब्ध होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.