मुंबई

नरेश गोयल यांना दिलासा

CD

नरेश गोयल यांना दिलासा

बँक खाते फसवे ठरवण्याचा निर्णय रद्द 

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांचे बँक खाते फसवे म्हणून वर्गीकृत करण्याचा बँक ऑफ इंडियाचा निर्णय उच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला. या आधारावर केलेल्या सर्व कारवायाही न्या. रियाज छागला आणि आणि न्या. फरहान दुबाश यांच्या खंडपीठाने रद्द केल्या.

सुमारे ५३८.६२ कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीशी संबंधित आर्थिक गैरव्यहारप्रकरणी छापे टाकल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २० जुलै २०२३ रोजी गोयल यांना अटक केली होती. गोयल यांच्यावर सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे फौजदारी खटले सुरू आहेत.

कॅनरा बँकेने जेट एअरवेज इंडिया लिमिटेड, गोयल, त्यांची पत्नी अनिता, कंपनीचे माजी कार्यकारी जी. शेट्टी आणि इतर अनाेळखी सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर हे छापे टाकण्यात आले होते. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, एअरलाइनला ८४८.८६ कोटी रुपयांची क्रेडिट मर्यादा आणि कर्जे मंजूर केली होती. त्यापैकी ५३८.६२ रुपये कंपनीने परत केले नाहीत. त्यानंतर २९ जुलै २०२१ रोजी गोयल यांचे बँक खाते फसवे म्हणून वर्गीकृत केल्याचे जाहीर करण्यात आले.  या गुन्ह्याच्या आधारे ईडीने गोयल आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण दाखल केले होते. तथापि, उच्च न्यायालयाने २०२३ मध्ये हे प्रकरण रद्द करून गोयल दाम्पत्याला दिलासा दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : दौरे थांबवा, अडथळे येतील; शरद पवार यांचे मंत्री, लोकप्रतिनिधींना आवाहन

Sakal Relief Fund : पूरग्रस्तांसाठी सरसावले मदतीचे हात; ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे मदतीचा ओघ दुसऱ्या दिवशीही सुरू

Maharashtra Red Alert : राज्यातील बावीस जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

Rohit Pawar : ‘’मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिलेली प्रतिक्रिया बघता महाराष्ट्राला...’’ ; रोहित पवारांनी साधला निशाणा!

Finance Ministry New Address: अर्थ मंत्रालयाला नवे घर मिळणार, नॉर्थ ब्लॉकमधून बाहेर पडणार, 'या' भवनात नवा प्रवास सुरू करणार

SCROLL FOR NEXT