दिबांच्या नावाचा गावोगावी जागर
विमानतळ नामकरणासाठी आंदोलनाची रणनीती
तुर्भे, ता. २७ (बातमीदार) ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून नवी मुंबईतील २९ गावांत जागर यात्रा सुरू आहे. या यात्रेला प्रकल्पग्रस्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लवकरच उद्घघाटन होणार आहे. या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी प्रकल्पग्रस्तांचा अटीतटीचा संघर्ष सुरू आहे. केंद्र सरकारने दिबांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर केलेला नाही. त्यामुळे मोठ्या आंदोलनाची प्रकल्पग्रस्तांकडून तयारी केली जात आहे. याच अनुषंगाने नवरात्रीचे औचित्य साधून आगरी-कोळी युथ फाउंडेशन, नवी मुंबईतील सामाजिक संघटनांच्या वतीने २७ गावांमध्ये आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठीची जनजागृती केली जात आहे.