मुंबई

पान २ पट्टा

CD

बेकायदा पार्किंगवरून युवा सेना आक्रमक
वाशी (बातमीदार) ः नवी मुंबईतील एमआयडीसीतील रस्ते, समांतर रस्ते आणि ठाणे-बेलापूर मुख्य रस्त्यांवर टँकर, अवजड वाहने व इतर वाहनांचे बेकायदा पार्किंगमुळे कोंडी, अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर युवा सेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांना निवेदन दिले.
तुर्भे ते नेरूळपर्यंतच्या सेवा रस्त्यावरील उभी राहणारी अवजड वाहने, तळवली नाक्यापासून आंबेडकर चौक परिसरातील वाहतूक कोंडी, कोपरखैरणेतील डी-मार्ट ते तीन टाकी व स्टेशन रोडवरील वाहतूक तसेच ठाणे-बेलापूर रोड, सानपाडा येथील गंभीर वाहतूक समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या वेळी तिरुपती काकडे यांनी तातडीने बेकायदा पार्किंग हटवणे, वाहतुकीत अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांच्या सुरक्षेला धोकादायक ठरणाऱ्या प्रत्येक समस्येविरोधात युवा सेना सातत्याने आवाज उठवत आहे. प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे लवकरच नवी मुंबईकरांना वाहतूक कोंडी, बेकायदा पार्किंगच्या समस्येतून दिलासा मिळेल, असा विश्वास युवा सेना जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी व्यक्त केला.
ः-------------------------------------
‘कोपरखैरणेतील रुग्णालय सुरू करा’
तुर्भे (बातमीदार) ः कोपरखैरणे येथील माता-बाल रुग्णालयाची इमारत धोकादायक झाल्यामुळे नऊ वर्षांपूर्वी येथे नवीन इमारतीचा पाया रचला गेला. विविध अडथळे पार करत चार महिन्यांपूर्वी रुग्णालयाची इमारत तयार झाली; पण अजूनही या इमारतींचे लोकार्पण करण्यात आलेले नाही. त्यामुळे परिसरातील रुग्णांना आरोग्यविषयक विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे, पालिकेच्या सुरू असलेल्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच इतर कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे कोपरखैरणेतील रुग्णालय मनुष्यबळाची कमतरता असल्याने सुरू होण्यास विलंब होत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कर्मचाऱ्यांची भरती करावी, तसेच रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी मनसे कोपरखैरणे विभागप्रमुख चंद्रकांत डांगे यांनी केली आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़ः------------------------------------------
शालेय मुलींसाठी समुपदेशन मेळावा
पेण (वार्ताहर) ः ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’अंतर्गत मैत्री क्लिनिक अलिबागमार्फत पेण येथील सार्वजनिक विद्यामंदिर शाळेतील मुलींसाठी सखी सावित्री समितीच्या वतीने समुपदेशन, जाणीव जागृती मेळावा करण्यात आला होता. या वेळी जिल्हा रुग्णालयाच्या किशोरवयीन आरोग्य समुपदेशिका अपर्णा करंदीकर यांनी किशोरवयीन वयामध्ये मुलींनी आवश्यक असलेले अन्नघटक व पोषक आहार वेळेवर करणे आवश्यक असून अंतर्गत अवयवांची रचना स्पष्ट होत असल्याचे सांगितले. तसेच या वयात येणाऱ्या अडचणी तत्काळ आईला, बहिणीला सांगितल्या पाहिजे, असे सांगितले. या वेळी सावित्री समितीच्या अपर्णा कोळी, संस्थेचे अध्यक्ष पी. डी. पाटील, मुख्याध्यापक एस. एच. नाईक, पर्यवेक्षक एस. एस. मोरे, शिक्षक प्रतिनिधी अपर्णा कोळी, शिक्षिका सदस्य कविता जोशी आदी उपस्थित होत्या.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal News: Pune Police Raid मध्ये हाती काय सापडलं? निलेश घायवळ थेट इंग्लंडला रवाना | Sakal News

Sangola Heavy Rain : सांगोला तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस; २७ घरांची पडझड, तीन जनावरांचा मृत्यू

Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीला गेल्यावर अजिबात करू नका 'या' 3 चुका, नाहीतर तुमचं नुकसान होणारच..!

टीम इंडियाने पाकिस्तानची पुन्हा जिरवली! Asia Cup Final च्या पूर्वसंध्येला केले अपमानित; वाचा काय घडले

Latest Marathi News Live Update: नागपूरमध्ये पावसाची हजेरी, विदर्भात मध्यम स्वरुपाचा पाऊस

SCROLL FOR NEXT