मुंबई

राहुल गांधींचा प्रकाश पगारेंना फोन

CD

राहुल गांधींचा प्रकाश पगारेंना फोन
कल्याण, ता. २७ (बातमीदार) ः साडी नेसविल्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश पगारे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते व संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (ता. २५) पगारे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. ‘मामा तुम्ही घाबरू नका, काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे. आम्हाला तुमच्याबाबत बाळासाहेब थोरातांनी माहिती दिली आहे. तुम्ही ५० वर्षांपासून काँग्रेसचे कार्यकर्ते आहात, तुमचा खूप आदर आहे,’ असे राहुल गांधी यांनी सांगितले.

प्रकाश पगारे यांनी ‘राहुल गांधी मुंबईत आले तर लवकर माझी भेट घेतील’ अशी अपेक्षा व्यक्त केली. नरेंद्र मोदी यांचा साडीवरील फोटो प्रकाश पगारे यांनी समाजमाध्यमांवर व्हायरल केला होता. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, संदीप माळी आणि त्यांच्या साथीदारांनी पगारे यांना बोलावून साडी नेसवली होती. या घटनेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त झाला होता. याप्रकरणी कल्याण-डोंबिवलीतील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपींवर कारवाईची मागणी केली होती. या घटनेनंतर पगारे यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंदर्भात राहुल गांधींनी स्वतः फोन करून ‘मामा, तुम्ही न घाबरता ठाम राहा, काँग्रेस तुमच्यासोबत आहे, असा दिलासा दिला. ‘मला खात्री आहे, राहुल गांधी मुंबईला आले की मला भेटल्याशिवाय राहणार नाहीत,’ असे पगारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal News: Pune Police Raid मध्ये हाती काय सापडलं? निलेश घायवळ थेट इंग्लंडला रवाना | Sakal News

Sangola Heavy Rain : सांगोला तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस; २७ घरांची पडझड, तीन जनावरांचा मृत्यू

Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीला गेल्यावर अजिबात करू नका 'या' 3 चुका, नाहीतर तुमचं नुकसान होणारच..!

टीम इंडियाने पाकिस्तानची पुन्हा जिरवली! Asia Cup Final च्या पूर्वसंध्येला केले अपमानित; वाचा काय घडले

Latest Marathi News Live Update: नागपूरमध्ये पावसाची हजेरी, विदर्भात मध्यम स्वरुपाचा पाऊस

SCROLL FOR NEXT