मुंबई

विजेचा धक्का लागून दहा वर्षीय मुलाचा मृत्यू

CD

विजेचा धक्का लागून दहा वर्षीय मुलाचा मृत्यू
पाच महिन्यांनंतर घरमालकाविरोधात गुन्हा दाखल

अंबरनाथ, ता. २७ (वार्ताहर) ः विजेचा धक्का लागून दहावर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. ही घटना एप्रिल महिन्यात घडली असून तब्बल पाच महिन्यांनंतर शेजारी राहणाऱ्या घरमालकाविरोधात अंबरनाथ पोलिस ठाण्यात मृत मुलाच्या आईच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे.

अंबरनाथ पश्चिमेतील लादिनाका परिसरात हनुमान मंदिराशेजारी इंदू राकेश यादव आपल्या परिवारासोबत राहतात. त्यांचा मुलगा अंश (वय १०) हा २३ एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास खेळत असताना चेंडू शेजारी राहणाऱ्या श्यामसुंदर रामदुलार पांडे यांच्या दुमजली घराच्या छपरावर गेला. चेंडू काढण्यासाठी पत्र्यावर चढलेल्या अंशला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. गंभीर दुखापतीमुळे घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. आपला मुलगा खेळायला गेला होता. तो रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने यादव परिवाराने शोधाशोध सुरू केली. तसेच बेपत्ता मुलाच्या शोधासाठी अंबरनाथ पोलिसात तक्रारही दाखल केली होती; मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी अंशचा मृतदेह श्यामसुंदर पांडे यांच्या घरावर आढळला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर मृत अंशची आई इंदू यादव यांनी शेजारी राहणारे घरमालक श्यामसुंदर पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या तक्रारीनुसार, पांडे यांच्या घरावरील पहिला मजला हा अनधिकृत असून तो थेट महावितरणच्या पसरलेल्या वायरींचे जाळे खाली बांधलेले आहे. त्यामुळेच अंश बॉल काढायला गेला आणि त्याला विद्युत प्रवाह लागून अंशचा मृत्यू झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. हा अपघात नसून घरमालकाने अनधिकृत बांधकाम केल्याने मुलाचा मृत्यू झाला असून त्यांना घरमालकाला जबाबदार धरत आई इंदू यादव यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे तब्बल पाच महिन्यांनंतर अंबरनाथ पोलिसांनी घरमालक श्यामसुंदर पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal News: Pune Police Raid मध्ये हाती काय सापडलं? निलेश घायवळ थेट इंग्लंडला रवाना | Sakal News

Sangola Heavy Rain : सांगोला तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस; २७ घरांची पडझड, तीन जनावरांचा मृत्यू

Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीला गेल्यावर अजिबात करू नका 'या' 3 चुका, नाहीतर तुमचं नुकसान होणारच..!

टीम इंडियाने पाकिस्तानची पुन्हा जिरवली! Asia Cup Final च्या पूर्वसंध्येला केले अपमानित; वाचा काय घडले

Latest Marathi News Live Update: नागपूरमध्ये पावसाची हजेरी, विदर्भात मध्यम स्वरुपाचा पाऊस

SCROLL FOR NEXT