मुंबई

जीएसटीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटीबद्ध

CD

जीएसटीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध
जगन्नाथ शिंदे यांचे प्रतिपादन; कल्याणमध्ये जागतिक फार्मासिस्टदिन उत्साहात साजरा

कल्याण, ता. २७ (वार्ताहर) ः २५ सप्टेंबर रोजी जगभर फार्मासिस्टदिन साजरा केला जातो. यावर्षी ‘थिंक हेल्थ थिंक फार्मासिस्ट’ ही थीम होती. ज्याचा उद्देश आरोग्यविषयक शंका आणि समस्या सोडवण्यात फार्मासिस्टचा महत्त्वाचा रोल अधोरेखित करणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात फार्मासिस्ट शपथ घेऊन झाली. प्राध्यापक मकरंद यांनी औषधांच्या संभाव्य दुष्परिणामांची नोंद सरकारच्या पोर्टलवर कशी करावी व रुग्णांना कशी माहिती द्यावी, याविषयी मार्गदर्शन केले. याशिवाय, सिम्स व मिम्स या औषधविषयक ई-पोर्टलचे प्रात्यक्षिक देण्यात आले.

मंजिरी घरत यांनी स्पेसिफिक केअर फार्मसी आणि फार्मासिस्टच्या प्राथमिक आरोग्य व्यवस्थेतील भूमिकेवर भर दिला. त्यांनी आभासी आणि एआय युगात मानवी संवादाचे महत्त्व पटवून दिले. अखिल भारतीय औषध संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी बाजारातील नकली आणि डुप्लिकेट औषधांबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमी केलेल्या जीएसटीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फार्मासिस्ट कटिबद्ध असल्याचे सांगितले.

कल्याणमधील केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय औषध संघटना अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या मंजिरी घरत, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदचे नितीन मणियार, फार्माको व्हिजिलन्सतज्ज्ञ प्राध्यापक मकरंद एकातपुरे, ठाणे जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष दिलीप देशमुख आणि २०० हून अधिक फार्मासिस्ट उपस्थित होते.

आईच्या भूमिकेत असावे
शिंदे यांनी महिला फार्मासिस्टनी आईची भूमिका निभावण्याचे आवाहन केले. त्यांनी ग्राहकांनी स्वदेशी आणि स्थानिक फार्मासिस्टकडेच जावे, असाही आग्रह धरला. कार्यक्रमात कल्याण शहरातील अनेक ज्येष्ठ फार्मासिस्टांचा सत्कार करण्यात आला. आयोजनात कल्याण केमिस्ट असोसिएशनच्या टीमच्या मेहनतीचे कौतुक करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : अतिवृष्टीचा विचार करून आगामी गळीत हंगाम शुभारंभाचा निर्णय घेणार

Vani Crime : पतीच्या त्रासामुळे माहेरी आलेल्या पत्नीस पतीनेच कातरीने वार करीत केली हत्या

Sangola Heavy Rain : सांगोला तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस; २७ घरांची पडझड, तीन जनावरांचा मृत्यू

Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीला गेल्यावर अजिबात करू नका 'या' 3 चुका, नाहीतर तुमचं नुकसान होणारच..!

Latest Marathi News Live Update: नागपूरमध्ये पावसाची हजेरी, विदर्भात मध्यम स्वरुपाचा पाऊस

SCROLL FOR NEXT