मुंबई

सांस्कृतिक वैभवाचा सोहळा रंगात

CD

सांस्कृतिक वैभवाचा सोहळा रंगात
रासरंग नवरात्रोत्सवात गरबा रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उत्सवाला भेट

डोंबिवली, ता. २७ : डोंबिवलीत पुन्हा एकदा नवरात्रोत्सवाचा जल्लोष रंगला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रासरंग - २०२५’ हा नवरात्र महोत्सव डीएनसी शाळेच्या मैदानावर मोठ्या उत्साहाने सुरू आहे. सातव्या वर्षात पदार्पण करणारा हा सोहळा यंदाही भव्यतेने, कलात्मकतेने आणि उमेदीने रंगवला जात आहे.

उत्सवाला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी (ता. २६) उपस्थित राहत सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. २२ सप्टेंबरपासून सुरू झालेला हा सोहळा आतापर्यंत पाच दिवसांमध्ये डोंबिवलीकरांसाठी खास आकर्षण ठरला आहे. दररोज हजारो गरबा रसिक पारंपरिक वेशभूषेत येऊन गरबा, दांडिया आणि सांस्कृतिक आनंद साजरा करीत आहेत. रंगीबेरंगी कपडे, पारंपरिक रचना, तालबद्ध नृत्यामुळे संपूर्ण मैदान उत्साहाने न्हालेलं आहे. या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे दांडिया किंग नैतिक नागदा यांच्या सूर आणि वाद्यसंगीताने उत्सवाला ऊर्जा प्रदान करणे. तरुणांसह वयोवृद्ध नागरिकही त्यांच्या संगीतावर थिरकले.

कुटुंबांसह आलेल्या लोकांनी गरब्याचा आनंद घेत नवरात्रीच्या पवित्रतेत रंग भरला आहे. या वर्षी सांस्कृतिक विविधतेचे विशेष दर्शन घडले आहे. नेत्रदीपक मंच, प्रकाशयोजना आणि प्रशस्त मैदानामुळे उत्सवाचा वैभव अधिक वाढला आहे. विविध मान्यवर आणि गायकांच्या उपस्थितीमुळेदेखील कार्यक्रमाची शान वाढली आहे. २०१८मध्ये सुरू झालेला रासरंग महोत्सव डोंबिवली आणि आसपासच्या भागातील सांस्कृतिक आयुष्यात महत्त्वाची भर घालत आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा उपक्रम परंपरा आणि आधुनिकतेचा संगम आहे.

विविध कार्यक्रम
१० दिवसांच्या नवरात्रात गरबा-दांडियाबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रमदेखील आयोजित केले जात आहेत. पारंपरिक वेशभूषा, नैतिक नागदांचा सूर, नेत्रदीपक रोषणाई आणि रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे रासरंग - २०२५ डोंबिवलीकरांसाठी अविस्मरणीय ठरतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : अतिवृष्टीचा विचार करून आगामी गळीत हंगाम शुभारंभाचा निर्णय घेणार

Vani Crime : पतीच्या त्रासामुळे माहेरी आलेल्या पत्नीस पतीनेच कातरीने वार करीत केली हत्या

Sangola Heavy Rain : सांगोला तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस; २७ घरांची पडझड, तीन जनावरांचा मृत्यू

Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीला गेल्यावर अजिबात करू नका 'या' 3 चुका, नाहीतर तुमचं नुकसान होणारच..!

Latest Marathi News Live Update: नागपूरमध्ये पावसाची हजेरी, विदर्भात मध्यम स्वरुपाचा पाऊस

SCROLL FOR NEXT