नवगाव राजिप शाळेत प्रेरणा दिन साजरा
अलिबाग (वार्ताहर) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महत्त्वाची भूमिका बजावतात. शिक्षणासोबतच मुलांच्या संस्कार आणि मूल्यवर्धनासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांना चालना देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागांतील कार्यरत अधिकारी वर्षातून किमान दोनदा शाळांना भेट देऊन प्रेरणा दिवस साजरा करणार आहेत.
यानुसार राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासोबत शुक्रवारी (ता. २६) तालुक्यातील राजिप शाळा, नवगाव येथे पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी सुसंवाद साधून मार्गदर्शन केले. बोरिस व गुंजीस येथील पाणंद रस्त्यांची पाहणी केली. या वेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदलकर, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
-----------------------
अलिबागमध्ये आधुनिक पद्धतीने महाभोंडला साजरा
अलिबाग, ता. २७ (वार्ताहर) ः येथील क्षात्रैक्य समाज हाॅल येथे शिवसेना महिला संघटन व आमदार महेंद्र दळवी यांनी नवरात्रीनिमित्त महाभोंडला बुधवारी (ता. २४) पार पडला. या वेळी खिरापत स्पर्धा आणि कर्तृत्ववान महिला आणि महिला भजनी मंडळांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला.
या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शिवसेना नेत्या मीना कांबळी, शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे, हास्यजत्राफेम हास्य कलाकार रसिका वेंगुर्लेकर, शिवसेना अलिबाग गटनेत्या मानसी दळवी, शिवसेना अलिबाग- मुरूड संपर्कप्रमुख संजीवनी नाईक, उद्यम सखी संस्थेच्या अध्यक्षा जुईली दळवी-जुईकर, आदिती नाईक उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीवनी नाईक यांनी केले. तृप्ती पाटील, भाग्यता पाटील, शमा नागवेकर, नमिता माळवी आदींनी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले.
-------------------------------------
बाहे येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
रोहा (बातमीदार) ः बाहे गावामध्ये नुकतेच आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी कोलाड व श्री विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, रोहा आणि गावदेवी शेतकरी गट, बाहे यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात बीपी, वजन संसर्गजन्य आजार आदी आरोग्यविषयी समस्यांवर तपासणी, उपाय, टीटी इंजेक्शन देण्यात आले. या शिबिरात सुमारे शंभरहून अधिक पुरुष, महिला आणि तरुणवर्ग यांनी आपली तपासणी केली.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.