मुंबई

‘सकाळ’ सामाजिक उत्तरदायित्वाचे व्यासपीठ

CD

पालघर, ता. २७ ः लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवातून सुरू केलेले कार्य ‘सकाळ भक्ती-शक्ती व्यासपीठा’च्या माध्यमातून आजही पुढे नेले जात आहे. समाजाला दिशा देण्याचे काम ‘सकाळ’ पूर्वापार करत आलेला आहे. सामाजिक क्षेत्रात ‘सकाळ’चे कार्य मोठे आहे. ‘सकाळ’ हा ब्रँड नसून सामाजिक उत्तरदायित्वाचे एक उत्तम व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र गावित यांनी केले.

‘सकाळ भक्ती-शक्ती व्यासपीठ’ व देवमोगरा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान सोहळा पालघरमधील शिक्षक पतपेढी सभागृहात शुक्रवारी (ता. २६) मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राजेंद्र गावित प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पालघरचे अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, जिल्ह्याचे गृह उपविभागीय अधिकारी रवींद्र नाईक, देवमोगरा वेल्फेअर फाउंडेशनचे विश्वस्त कल्पक पाटील, रोहित गावित, साईराज पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या वेळी ‘सकाळ’चे वृत्तसंपादक जयवंत चव्हाण, सुधीर दातार, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

‘सकाळ’ गणेशोत्सव सजावट ही केवळ स्पर्धा नसून कल्पकता, सामाजिक एकोपा, देशसेवापर संदेश आणि धार्मिक वातावरण निर्माण करण्याची संधी आहे. या स्पर्धेतून समाजातील एकोपा, कलावंताची प्रतिभा आणि भक्तिभाव अधिक दृढ होत आहे. यापुढेही हा वसा कायम जपून समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन गावित यांनी केले.

‘सकाळ भक्ती-शक्ती व्यासपीठ’ आणि देवमोगरा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम केवळ स्पर्धा न राहता भक्तिभाव, समाजसेवा आणि सांस्कृतिक मूल्यांचा संगम घडवणारा प्रेरणादायी सोहळा ठरला. या उपक्रमात तब्बल दीड हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दहा दिवस चाललेल्या या स्पर्धेतून निवड झालेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या ३० विजेत्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जतीन-प्रतिभा कदम यांनी केले, तर ‘तनिष्का’ व्यासपीठाच्या सदस्या सोहळ्याला उपस्थित होत्या.

नवीन पिढीला संस्कार!
आपले सण हे केवळ मनोरंजनासाठी नसून संस्कृती, परंपरा आणि प्रथा जपण्यासाठी आहेत, असे मत भाऊसाहेब फटांगरे यांनी येथे व्यक्त केले. ‘टाकाऊपासून टिकाऊ’ व ‘पर्यावरणपूरक सजावट’ या उपक्रमांनी समाजात जागरूकता निर्माण होते. समाजकार्यात अनेक जण विविध मार्गांनी पुढे येतात; मात्र अशा धार्मिक-सांस्कृतिक स्पर्धांमधून नव्या पिढीला संस्कारही मिळतात. ‘सकाळ’ने सामाजिक जबाबदारी जपणारी भूमिका फटांगरे यांनी अधोरेखित करत नियमित वाचनाची सवय लावण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

समाजासाठी निःस्वार्थी सेवा
‘सकाळ भक्ती-शक्ती व्यासपीठ’चे प्रमुख सुधीर सुतार यांनी भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून दिले. हे व्यासपीठ फक्त स्पर्धा घेणारे नाही, तर समाजासाठी काहीतरी करण्याची संधी देणारे एक माध्यम आहे. भक्तिमार्गाने जीवन जगणे म्हणजे समाजासाठी निःस्वार्थी सेवा करणे, परंपरा आणि संस्कृतीचा जप करताना समाजसेवेची गाठ सोडू नये, असे त्यांनी सांगितले.

पर्यावरणपूरकतेचा संदेश
विजयी स्पर्धकांना आयोजकांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. या वेळी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. पुढील काळातही अशा उपक्रमशील स्पर्धांचे आयोजन करून समाजात भक्ती, संस्कृती व पर्यावरणपूरकतेचा संदेश पोहोचवण्याचे काम ‘सकाळ’ करत राहील, असे आश्वासन ‘सकाळ’चे पालघर जिल्हाप्रमुख निखिल मेस्त्री यांनी दिले.

घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे विजेते
प्रथम क्रमांकाचे सन्मानार्थी : नामदेव वासुदेव नांदोसकर, स्नेहल व परेश महादेव घरत, राकेश विठ्ठल शिवदास, सागर मारुती चाळके, जगदीश राऊत आणि कुटुंबीय, गौरव राजेंद्र राऊत, दीप विजय बोपर्डीकर, शंकर शेरखाने, पूजा गाडगे, प्रणिता योगेश वर्तक.

द्वितीय क्रमांकाचे मानकरी : स्मितेज बळवंत पुरव, प्रतीक प्रकाश तिप्पट, रेवन नामदेव पाटील, सौरभ रवींद्र भोगले, विजय भगवंत हसनाळे, इंदुमती तुळशीनाथ भोईर, मनीष गजानन म्हात्रे, मानसी नीलेश देशपांडे, नितेश प्रभाकर पाटील, श्रेया सुयश घारपुरे.

तृतीय क्रमांकाचे विजेते : रितेश प्रकाश पाटील, तीर्थ निपूण दोषी, अमोल चंद्रकांत चौधरी, अनिता अशोक चुरी, दीपक अंकुश पाबळे, हरेश राऊत, हितेश मनोहर चाफेकर, नितीन खिरारी, सौरव दिलीप शेलार, सिद्धार्थ महेश शासने.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ethiopia Volcano Ash : मुंबई अन् दिल्लीपर्यंत पोहोचली इथोपियातील ज्वालामुखीची राख; अनेक विमानांची उड्डाणे रद्द, अलर्ट जारी

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर

Maharashtra Local Body Elections : स्थानिक निवडणुकांबाबत आज सर्वोच्च' फैसला, राजकीय पक्षांची धाकधूक वाढली!

Pune Voter List: मतदार यादी दुरुस्तीनंतरच निवडणूक घ्या; सर्वपक्षीय शिष्टमंडळाची पुणे महापालिका प्रशासनाकडे मागणी

सोलापूरची ७२ चितळं विसावली सह्याद्रीत ! ; व्याघ्र प्रकल्पाला गती देण्यासाठी वन विभागाचे मोठे पाऊल..

SCROLL FOR NEXT