देशातील पहिले बुलेट ट्रेन स्थानक सज्ज
सुरतमध्ये प्रवासी सुविधांना नवा आयाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः मुंबई-अहमदाबाद या देशातील पहिल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पात सर्वात पहिले पूर्णत्वास आलेले स्थानक म्हणजे सुरत बुलेट ट्रेन स्थानक होय. आधुनिक बांधणी, प्रवासी केंद्रित सुविधा आणि हरित बांधकामामुळे हे स्थानक राष्ट्रीय स्तरावर आदर्श ठरणार आहे.
सुरत बुलेट ट्रेन स्थानकात आरामदायी प्रतीक्षालये, शौचालये, रोपवाटिका, रिटेल दुकाने, माहिती किओस्क, सार्वजनिक घोषणा प्रणाली यांसारख्या सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. वयोवृद्ध, दिव्यांग व मुलांसह प्रवास करणाऱ्यांसाठी उद्वाहन व सरकते जिने बसवले गेले असून स्पष्ट दिशादर्शक फलकामुळे प्रवास अधिक सुलभ होणार आहे. सुरत महापालिका आणि सुरत शहरी विकास प्राधिकरणाच्या सहकार्याने आखण्यात आलेल्या मल्टीमोडल इंटिग्रेशन योजनेतून प्रवाशांना मेट्रो, बस, टॅक्सी, ऑटो यांमधून सहज प्रवास करता येईल. त्यामुळे वेळीच बचत वाचून प्रवास गतिमान आणि सुरक्षित होणार आहे. भारतीय ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उभारलेल्या या स्थानकामध्ये जलसंचयन, पाणी बचत करणारी यंत्रणा, पर्यावरणपूरक रंग, खुली जागा आणि नैसर्गिक प्रकाशासाठी स्कायलाइट्सचा समावेश आहे. हिरवाईने सजविलेलं लँडस्केपिंग प्रवाशांना ताजेतवाने वातावरण देणार आहे. सुरतच्या हिरे उद्योगाची ओळख जपणारे बाह्य आणि अंतर्गत आखणी या स्थानकाचे आणखी एक आकर्षण आहे. स्ट्रक्चरल काम पूर्ण झाले असून सध्या अंतर्गत सजावट अंतिम टप्प्यात आहे.
सुरत स्थानकाची मुख्य वैशिष्ट्ये
उंची : २६.३ मीटर
बांधकाम क्षेत्र : ५८,३५२ चौ. मीटर
तीन स्तर : ग्राउंड (पार्किंग, पिकअप-ड्रॉप, सुरक्षा तपासणी), कॉन्कोर्स (तिकीट काउंटर, प्रतीक्षा लाउंज, शौचालये, किओस्क) आणि प्लॅटफॉर्म स्तर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.