मुरबाड, ता. २७ (वार्ताहर) : धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत किसळ-पारगाव ग्रामपंचायत क्षेत्रात आदी कर्मयोगी केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २६) दुपारी मोठ्या उत्साहात झाले. उद्घाटनापूर्वी दोन्ही गावांत शिवार फेरी काढण्यात आली. या फेरीदरम्यान आदिवासी विकास विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना दिली. ग्रामसभेच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
केंद्राचे उद्घाटन केंद्र सरकारच्या जनजाती कार्य मंत्रालयाचे कार्यालय सचिव सूर्याश निगम आणि सरपंच डॉ. कविता वरे-भालके यांनी संयुक्तपणे केले. कार्यक्रमाला मंत्रालयातील अधिकारी, प्रकल्प कार्यालय शहापूरचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अरविंद जाधव, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी लोहकरे आणि पेसा तालुका समन्वयक प्रल्हाद लोकडे उपस्थित होते. आभार सरपंच डॉ. कविता वरे-भालके यांनी मानले, तर सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्या वैष्णवी पडवळ यांनी केले. सदस्य सुनील पडवळ, अनंत पारधी, भारती पारधी, आशासेविका हिरा दवने-पडवळ, अंगणवाडीसेविका ताराबाई भेरे, कविता जमदरे, सुरेखा दवणे, सी. आर. पी. सुनीता भालके, रत्ना पडवळ, जैव विविधता समिती सचिव धृपद भालके, महिला व विद्यार्थी उपस्थित होते.