मुंबई

एशियाटिकच्या निवडणूक नोव्हेंबरमध्ये

CD

एशियाटिकच्या निवडणूक नोव्हेंबरमध्ये

विक्रमी नव्या सदस्यांमुळे वादळी ठरणार

विनोद राऊत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः अनेक घडामोडींमुळे चर्चेत आलेल्या एशियाटिक सोसायटीची सर्वसाधारण सभा आज शनिवारी (ता. २७) पार पडली. एशियाटिक व्यवस्थापन समितीसाठी नव्या निवडणूक नोव्हेंबरमध्ये घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या वेळी ३५०च्या आसपास नवे सदस्य झाले आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक वादळी ठरणार असल्याचे चित्र आहे.

एशियाटिक सोसायटीच्या सर्वसाधारण बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्ये ८ नोव्हेंबरला कार्यकारिणीसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय पारित करण्यात आला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एशियाटिकचे सदस्यत्व घेण्यासाठी ३५०हून अधिक अर्ज आले होते. त्यातील बहुतांश अर्ज मंजूर झाले. आतापर्यंतच्या सोसायटीच्या इतिहासात एवढ्या प्रमाणात अर्ज आले नव्हते. या निवडणुका झाल्यास सर्वच्या सर्व नवीन सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर एशियाटिकची निवडणूक गाजणार असल्याची चिन्हे आहेत. गिरगावच्या साहित्य संघाच्या धर्तीवर एशियाटिकचे व्यवस्थापन ताब्यात घेण्याचा काहींचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यापूर्वी काही सदस्य व साहित्यिकांनी केले होते.

निवडणूक होण्यावर संशय कायम
एशियाटिकच्या व्यवस्थापनाबद्दल धर्मादाय आयुक्तांकडे काही तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी एशियाटिक व्यवस्थापनाला काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. अशा वेळी निवडणूक घेण्याच्या निर्णयाला कुणी आव्हान दिले तर काय, असा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला; मात्र निवडणूक घेणे ही नियमित प्रक्रिया आहे. आव्हान दिले तरी निवडणुकीवर काही परिणाम हाेणार नसल्याचा निर्वाळा काही सदस्यांनी दिला. यानंतरही निवडणुकीच्या मार्गातील अडथळे कायम असणार असल्याचे मत काही सदस्यांनी व्यक्त केले आहे.
....
वार्षिक बजेटमध्ये तीन काेटींची तूट
एशियाटिक सोसायटीपुढे अनेक आर्थिक अडचणी आहेत. याचा कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या पगारावर तसेच रिक्त पदे भरण्यावर परिणाम होत आहे. वार्षिक बजेटमध्ये जवळपास तीन कोटी रुपयांची तूट आहे. यावर बैठकीत चर्चा झाली. कोलकाता एशियाटिक सोसायटीच्या धर्तीवर मुंबई एशियाटिकला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून दर्जा देण्यासाठी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात येणार आहे. या समितीचे स्वरूप अजून अंतिम झाले नाही. समितीत अजून काही सदस्यांची नावे समाविष्‍ट केली जातील, असे व्यवस्थापन समितीच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
...
व्‍यवस्थापन समितीचे स्वरूप
एशियाटिकच्या व्यवस्थापन समितीत अध्यक्ष, चार उपाध्यक्ष, सचिव व इतर सदस्य असे ११ जण असतात. या समितीसाठी ही निवडणूक हाेणार असून, अध्यक्ष, सचिव व उपाध्यक्षांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy rally तामिळ सुपरस्टार विजयच्या रॅलीत प्रचंड चेंगराचेंगरी; ३५ मृत्यू, ७० जण जखमी

Eknath Shinde : अतिवृष्टीच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Parli Vaijnath News : तालुक्यात आभाळ फाटले, तीन मंडळात अतिवृष्टी; गेल्या तीस वर्षांचे पावसाने रेकॉर्ड तोडले, शेतातील पिकांत पाणीच पाणी

Asia Cup 2025 Final: भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार, पाकिस्तानविरुद्ध मॅच विनर खेळाडू मैदानात उतरवणार

Khokya Bhosle: खोक्या भोसलेवर आता 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई; जामीन मिळताच हर्सूल कारगृहात रवानगी

SCROLL FOR NEXT