मुंबई

सरळगाव, म्हसा परिसरात वीजपुरवठा खंडित

CD

सरळगाव, म्हसा परिसरात वीजपुरवठा खंडित
पावसामुळे भाताच्या रोपांवर परिणाम होण्याची भीती

मुरबाड, ता. २८ (वार्ताहर) : मुरबाड तालुक्यात शनिवारी (ता. २७) संध्याकाळी ७ वाजल्यापासून परतीच्या पावसाने जोरदार बॅटिंग सुरू झाली असून, संपूर्ण तालुक्यात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी मुरबाड शहरात १६ मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यातील तलाठी सजा करवले हद्दीतील मोजे शीद गावात लयकर पाडा येथे पार्वती शंकर पराड यांचे कच्चे मातीचे घर पावसामुळे कोसळले आहे. घरात कोणी नव्हते, त्यामुळे जीवितहानी झाली नाही. धसई परिसरातील पिंपलघर येथील शंकराचे मंदिरसुद्धा पाण्याखाली गेले आहे.

पावसामुळे भातशेतीला धोका निर्माण झाला आहे. शनिवारपर्यंत भाताची रोपे चांगल्या स्थितीत होती आणि शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता, परंतु पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे भाताची रोपे आडवे पडण्याची आणि मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शनिवारी संध्याकाळी सुरू झालेल्या पावसामुळे सरळगाव व म्हसा परिसरात वीजपुरवठा जवळपास १३ तास खंडित झाला. यामुळे नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. महावितरणाच्या पथकाने रात्रीही विजेचा पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले, पण ते अपयशी ठरले. अखेर रविवारी सकाळी १२ वाजेपर्यंत सर्व ठिकाणी विजेचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला, अशी माहिती मुरबाड महावितरण कंपनीने दिली आहे.

फोटो ओळ : धसई परिसरातील क्षेत्र पिंपलघर येथील शंकराचे मंदिर पाण्याखाली गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस! मुख्यमंत्र्यांकडून मदत कार्याचा आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या विशेष सूचना

IND vs PAK Final: अर्शदीप सिंगच्या 'हातवाऱ्याने' पाकिस्तानींच्या बुडाला लागली आग; ICC कडे केली तक्रार, म्हणतात...

Mhada House: आधी मागणी नंतर घर! धूळखात पडून राहणाऱ्या घरांवर उतारा, म्हाडाचा निर्णय

IND vs PAK Final Live: अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या यांना खुणावतोय मोठा विक्रम; 'नापाक' हॅरिस रौफही पाहतोय स्वप्न

Viral Video : पाकिस्तानात कसा साजरा होतो नवरात्रोत्सव? आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT