मुंबई

उल्हासनदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ

CD

उल्हास नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
बदलापूर, ता. २८ (बातमीदार) ः उल्हास नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगड व ठाणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नवरात्रीत पडणाऱ्या या पावसामुळे गरबाप्रेमींच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.

ठाणे व रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने लोणावळा येथून उगम पावणारी तसेच बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होत आहे. दुपारी १२च्या सुमारास उल्हास नदीची पाणीपातळी ही १५.५० मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, उल्हास नदीची इशारा पातळी ही १६.५० तर धोक्याची पातळी १७.५० इतकी आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शहरातून वाहणाऱ्या नाल्यांनादेखील पूर आला आहे. बदलापूर पूर्वेकडून रेल्वेपुलाखालून वाहणारा नाला हा पश्चिमेला शनिनगर नाल्यात येऊन मिळतो. पुढे हा नाला उल्हास नदीला जाऊन मिळतो. रेल्वेपुलाखालून वाहणाऱ्या या नाल्याच्या बाजूने अरुंद असा बोगदा आहे. नाला दुथडी भरून वाहू लागल्याने जवळजवळ बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे; मात्र जीव धोक्यात घालून या ठिकाणाहून दुचाकीस्वार वाहतूक करत आहेत. पाणीपातळी वाढल्यानंतर, या बोगदातून वाहतूक पूर्णपणे बंद होते. सध्या पावसाचा जोर वाढत असून, नाल्यालादेखील पूर आल्याने शहरातील सखल भागातदेखील पाणी साचायला सुरुवात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK, Final: 33 runs 9 wickets ! पाकिस्तानी गडगडले; हवेत उडत होते, भारतीय स्पिनर्सने जमिनीवर आपटले

IND vs PAK Final Live: हायव्होल्टेज ड्रामा! सूर्यकुमार यादव पाकिस्तानी कर्णधार सलमान आगावर संतापला; अम्पायरसोबत वाद, वाचा नेमका काय राडा झाला

Swami Chaitanyanand Saraswati : स्वामी चैतन्यानंद सरस्वती याला ५ दिवसांचा पोलिस कोठडी; पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा झटका

IND vs PAK Final: ICC ने दंड ठोठावल्यावर सुधारला पाकिस्तानी ओपनर, पण आऊट होताच भडकला अन्...; VIDEO

Balasaheb Thorat: संकटातील बळीराजाला कर्जमाफी द्या : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात; सरकारला गांभीर्य नाही

SCROLL FOR NEXT