मुंबई

संततधार पावसाने वाहतूक मंदावली

CD

संततधार पावसाने वाहतूक मंदावली
पोयनाड, ता. २८ (बातमीदार) ः परिसरात रविवारी दिवसभर संततधार पडणाऱ्या पावसामुळे पेण-अलिबाग राज्यमार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता. सुट्टीचा दिवस असल्याने मुंबई-पुणे येथून निघालेल्या पर्यटकांना पांडवादेवी ते पेझारीदरम्यान कोंडीचा फटका बसला.
पोयनाड बाजारपेठेत व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. वडखळ-अलिबाग राज्यमार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. त्याचा सर्वाधिक फटका एसटीने प्रवास करणाऱ्यांना बसला. जवळचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागत असल्याने स्थानिकांना मनस्ताप झाला. ठिकठिकाणी वाहतूक पोलिस, होमगार्ड तैनात करण्यात आले होते. मुंबई, पुण्याकडे जाण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. पावसामुळे कोणतेही नुकसान अथवा जीवितहानी झाली नाही; पण जनजीवनावर विपरीत परिणाम दिसून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला ४ दिवस अतिवृष्टीचा धोका! मुंबईसह अन्य जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याने दिली मोठी अपडेट

Gas Cylinder Port: ग्राहकांसाठी खुशखबर! मोबाइलसारखी सुविधा; गॅस बदलायला मिळणार ‘पोर्टेबिलिटी’चा पर्याय, पण कधीपासून?

IND vs PAK Final: सूर्यकुमार यादवच्या बॅटवर सचिन तेंडुलकरचा 'खास' संदेश; पाकड्यांचं आता काही खरं नाही; काय लिहिलंय असं?

Akkalkot Rain Update: 'अक्कलकोट तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस'; भिंत पडून तीन जखमी; अनेक गावांचे रस्ते झाले बंद

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा - खासदार निलेश लंके

SCROLL FOR NEXT