मुंबई

रायतेत नवरात्रोत्सवात मोफत महाआरोग्य शिबिर

CD

रायतेत नवरात्रोत्सवात मोफत महाआरोग्य शिबिर
टिटवाळा, ता. २९ (वार्ताहर) : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायते येथे जय मातादी मित्र मंडळ, रेड स्वस्तिक सोसायटी आणि स्पर्श फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात एकूण १९५ नागरिकांनी विविध तपासण्या करून घेतल्या. या शिबिरात ईसीजी, शुगर, ब्लड प्रेशर, जनरल तपासणी, दंत तपासणी, कार्डियाक चेकअप, स्त्रीरोग तपासणी, हाडांची तपासणी आदी सेवा पुरवल्या. डोंबिवली येथील एएसजी हॉस्पिटल, अंबरनाथ येथील साई सिटी हॉस्पिटल आणि टिटवाळा येथील सिद्धेश्वर हॉस्पिटल यांनी यामध्ये मोफत सहकार्य केले.

आरोग्य शिबिरात महिला, पुरुष तसेच लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष राम सुरोशी यांनी नागरिकांना आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन करत मंडळाचे कौतुक केले. या शिबिराला माजी सरपंच संतोष सुरोशी, माजी सरपंच सुनील सुरोशी, माजी उपसरपंच हरेश पवार, काँग्रेस तालुका युवक अध्यक्ष अमोल सुरोशी आदी मान्यवर, ग्रामस्थ व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच रेड स्वस्तिक सोसायटीचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रमोद नांदगावकर, कमलेश बोनवटे, मुकुंद नावकर, लखन जगताप, स्पर्श फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुष्पराज स्वामी, एएसजी हॉस्पिटलच्या कांचन गौंड, सिद्धेश्वर हॉस्पिटलचे डॉ. सिद्धेश्वर चामनारू, साई सिटी हॉस्पिटलचे डॉ. आनंद भंडारी, संदीप महाले यांनी नागरिकांच्या तपासणीसाठी योगदान दिले. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक किरण पवार, वासुदेव पवार व शनी पवार यांनी सर्व सहकारी संस्था, डॉक्टर आणि नागरिकांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC HSC Exam Form : दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Viral Video : पतीसोबत गरबा खेळताना अचानक कोसळली महिला अन्... हृदयद्रावक व्हिडिओ

Pune News : ११६ कोटीची जमीन नाममात्र दरात हस्तांतरित करा; अजित पवारांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

Phulambri News : फुलंब्रीत तिहेरी मृत्यूच्या घटना! विद्युत शॉक, गळफास व विषारी औषधाने तिघांचा बळी

Latest Marathi News Live Update : पंजाबमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी जाहीर केले पॅकेज

SCROLL FOR NEXT