मुंबई

पावसाने वाहतुकीला ब्रेक

CD

पावसाने वाहतुकीला ब्रेक
नवी मुंबईला झोडपले, वाहनचालकांना मनस्ताप
वाशी, ता. २८ (बातमीदार) ः अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर नवी मुंबई शहरात रविवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे ठाणे-बेलापर मार्गासह सायन-पनवेल महामार्ग, एमआयडीसीतील रस्ते जलयम झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता.
ठाणे-बेलापूर मार्गावर रबाळे येथे दिघा रेल्वेस्थानकासमोरील चौकांत पाणी साचले होते. सायन-पनवेल महामार्ग, एमआयडीसी, ठाणे-बेलापूर मार्गावरील रस्त्यांवर पाणी साचले होते. सायन-पनवेल महामार्गवर कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. दिवसभर काळोख पसरल्याने वाहनचालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. नवरात्रोत्सवाआधी पालिकेने खड्डे बुजवण्याचे काम केले होते; पण मुसळधार पावसाने पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिघा येथील थॉमसन प्रेस, ऐरोली येथील रिलायन्स मॉलसमोर, ऐरोली सेक्टर १६ येथील मासळी मार्केट, रबाळे येथील टी जंक्शन, एमआयडीसी रस्त्यावरील यादवनगर परिसरात, सानपाडा सबवे, जुईनगर सबवे, घणसोली येथील भुयारी मार्गात पाणी साचले होते.
------------------------------
शहर सरासरी (मिमी)
बेलापूर ६६
नेरूळ ६६
वाशी ४०.४०
कोपरखैरणे ५५.४०
ऐरोली ५५.२०
दिघा ५०.८०
सरासरी ५५.६३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारताला धक्का! हार्दिक पांड्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; फायनलसाठी कसे आहेत संघ

Veer Sharma: दुर्दैवी! फ्लॅटमध्ये आग लागली अन्...; टीव्हीवरील प्रसिद्ध बाल कलाकार आणि त्याच्या भावाचा मृत्यू, सिनेक्षेत्रात हळहळ

IND vs PAK Final Live: चल हट...! सूर्यकुमार यादवचा पाकिस्तानी कर्णधारासोबत फोटो काढण्यास नकार, वातावरण तापले; मोहसिन नक्वीचे वादग्रस्त विधान

Vivek Kolhe: गुन्हेगारांना पाठीशी घालणारा ‘आका’ कोण?: विवेक कोल्हेंचा सवाल; फरार स्वीय सहायकास पोलिसांसमोर हजर करा

Navratra Bhondla: नवरात्रात भोंडला का खेळतात? हे त्यामागील कारण

SCROLL FOR NEXT