मुंबई

अतिवृष्टीने जीवाला घोर

CD

अतिवृष्टीने जीवाला घोर
जिल्ह्यातील संवदेनशील क्षेत्रांत विशेष खबरदारी
अलिबाग, ता. २८ (वार्ताहर) ः भारतीय हवामान विभागानुसार मंगळवार (ता. ३०)पर्यंत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या काळात संवेदनशील असलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये आपत्ती उद्भवण्याच्या शक्यतेमुळे नागरिकांनी आवश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, नदी व समुद्रकिनारी जाणे टाळावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हा नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सखल भागात पाणी उपसा पंप तैनात आहेत. जुन्या तसेच धोकादायक इमारतींमधील नागरिकांना आवश्यक उपाययोजनांसाठी सूचना देण्यात आल्या आहेत. वीज आणि रस्ते दुरुस्तीसाठी पथके, साखळी आरे आणि फीडर संरक्षण युनिट्स तैनात आहेत. संकटकाळात नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्रशासन सुरक्षेसाठी तत्पर आहे, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश शिर्के यांनी केले आहे.
---------------------------
बंदरावर तीन नंबरचा बावटा
रायगड जिल्ह्यातील सर्व बंदरांवर तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. रविवारी पहाटेपासून सर्वत्र पावसाचा जोर वाढला. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूकही मंदावली होती.
----------------------------
येथे संपर्क साधा
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र अधिकाऱ्यांशी ८२७५१५२३६३ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस! मुख्यमंत्र्यांकडून मदत कार्याचा आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या विशेष सूचना

Mhada House: आधी मागणी नंतर घर! धूळखात पडून राहणाऱ्या घरांवर उतारा, म्हाडाचा निर्णय

IND vs PAK Final Live: अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या यांना खुणावतोय मोठा विक्रम; 'नापाक' हॅरिस रौफही पाहतोय स्वप्न

Viral Video : पाकिस्तानात कसा साजरा होतो नवरात्रोत्सव? आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ व्हायरल

Beetroot Pasta: लहान मुलांसाठी खास, घरच्या घरी बनवा बीटरूटचा हेल्दी आणि चविष्ट पिंक पास्ता

SCROLL FOR NEXT