कर्जत शहरात जनजागृती रॅली
कर्जत (बातमीदार) ः कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी (ता. २६) जागतिक फार्मासिस्टदिनानिमित्त कर्जत शहरात रॅली काढली होती. या वेळी चौका-चौकात पथनाट्य सादर करून जनजागृती केली. या रॅलीची सुरुवात सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण नवले यांच्या हस्ते झाली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. मोहन काळे, उपप्राचार्य डॉ. अमोल चांदेकर, संतोष साळुंखे, प्रा. मोहसीन मान्सूरी आदी उपस्थित होते. त्यानंतर ही रॅली, आमराई मार्गे, कर्जत शहरात आली. लोकमान्य टिळक चौकात स्वरांजली आपटेकर, साक्षी पोपेटे, हेमांगी खाडे, दिक्षा विडे, सानिया कराळे, सुजल सरोडे, रितेश इंगळे, सुषांत कराळे, निशांत शेंडे, विनय काळेकर या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. याप्रसंगी प्रा. सिद्धिका धोपे, प्रा. आसिया दडेल, प्रा. पूजा ढंगार, विकास फिरके, संजय चौधरी, रेवती देशपांडे, ममता पाटणकर, पार्थ श्रीकांदे, वेदिका पवार, रवीभूषण, दिव्या सोनवणे आदी उपस्थित होते.
स********************
गौळवाडी शाळेत विद्यार्थ्यांना आग नियंत्रणाचे मार्गदर्शन
कर्जत (बातमीदार) ः गौळवाडी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमासाठी तालुक्यातील रेस्क्यू टीमचे सदस्य सुमीत गुरव यांनी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गुरव यांनी विद्यार्थ्यांना आग लागल्यास कोणती काळजी घ्यावी, सुरक्षिततेसाठी कोणते टप्पे पाळावेत आणि पोर्टेबल फायर एक्स्टिंग्विशर योग्य पद्धतीने कसे वापरावे, याचे प्रात्यक्षिक दाखवून समजावून सांगितले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. शाळेचे मुख्याध्यापक अनिल गलगले तसेच शिक्षकवर्ग या वेळी उपस्थित होते.
स९**************
अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
कर्जत (बातमीदार) ः अभिनव ज्ञान मंदिर संस्थेने जिल्ह्यात मोडकळीस आलेल्या शाळांना नवी इमारत उभारून आदर्श घालून दिला आहे. कनिष्ठ महाविद्यालयासाठी रमा पुरुषोत्तम ट्रस्टच्या सात कोटी रुपयांच्या मदतीने चार मजली नूतन इमारत उभारली असून, शनिवारी (ता. २७) डॉ. आनंद देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. फाउंडेशनच्या अध्यक्षा चित्रा बुझ्रुक यांनी कोनशिलेचे अनावरण केले. अध्यक्ष गणेश वैद्य, कार्याध्यक्ष श्रीराम पुरोहित यांच्यासह उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक विलास शिंदे यांनी केले. या वेळी राज्य पुरस्कारप्राप्त डॉ. रंजना देशमुख, अनिल गलगले यांच्यासह इतरांचा गौरव झाला.
*सससससससससससससस
कपिल पाटील एज्युकेशन ट्रस्टकडून कोकण ज्ञानपीठाला नवी दिशा
कर्जत, ता. २८ (बातमीदार) ः कोकण ज्ञानपीठ इंजिनिअरिंग कॉलेज येथे नव्या शैक्षणिक वर्षासाठी ओरिएंटेशन कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी विशेष पोलिस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) संजय दराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात कपिल पाटील एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे चेअरमन माजी केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील नवे ट्रस्टी म्हणून प्रथमच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्यासोबत व्हॉइस चेअरमन प्रकाश मुथा, सीईओ प्रदीपचंद्र शृंगारपुरे, मेंबर झुलकरनैन दाभिया आणि प्राचार्य विलास पिल्लेवान उपस्थित होते. श्रेया कपिल पाटील, अन्वेषा मुथा, सारिपुता वांगडी आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते.
कपिल पाटील म्हणाले की, या महाविद्यालयाचे विद्यार्थी भविष्यात मोठी झेप घेतील. गेल्या काही वर्षांत महाविद्यालयासमोरील अडचणींवर मात करून आता संस्थेच्या वाटचालीला नवी दिशा मिळेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.