मुंबई

भाताचे कोठार संकटात

CD

भाताचे कोठार संकटात
जिल्ह्यातील शेतकऱ्याचे पावसामुळे नुकसान
अलिबाग/ कर्जत/ खालापूर, ता.२८ (बातमीदार)ः दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सप्टेंबर अखेरीसही पावसाचा जोर कायम असल्याने भाताचे कोठार असा लौकिक असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल आहे.
भाताची रोपे अक्षरशः कोलमडून पडली असून, पिके पाण्याखाली गेली आहेत. सततच्या पावसाने झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न सुरू असताना पुन्हा आलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जत तालुक्यातील भातशेती ही फक्त उत्पन्नाचे साधन नसून घरगुती धान्य आणि शेतीची परंपरा जपण्यासाठी घेतली जाते, मात्र हेक्‍टरी लागणारा खर्च आणि मिळणारे उत्पादनाचा ताळमेळ नसताना नैसर्गिक आपत्तीने सर्व गणित कोलमडून टाकले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, कर्जफेड करणे कठीण झाले आहे. पिके नष्ट झाल्यामुळे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे, मात्र पंचनाम्यानंतर प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या हातात कधी येईल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
---------------------------
उपजीविकेचा प्रश्न
कर्जत तालुक्यातील परिस्थिती अतिशय गंभीर असून, शासनाने आर्थिक मदत, कर्जमाफी, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे. ओला दुष्काळ जाहीर करून मदतीची प्रक्रिया गतिमान करावी, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने कार्यवाही झाली नाही, तर आगामी काळात उपजीविकेवर संकट ओढवण्याची परिस्थिती आहे. हस्त नक्षत्रात वरुणराजाचे वाहन मोर असून, पावसाचा जोर वाढल्याने भातपिकावर परिणाम होण्याच्या भीतीने खालापुरातील बळीराजा चिंतित आहे.
़़़़़़़ः------------------------------------------
जेमतेम उत्पन्नावर पाणी
- रायगड जिल्हा भाताचा कोठार म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षातील औद्योगिकीकरणामुळे शेत-जमिनींची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. काही ठिकाणी शिल्लक राहिलेली शेती प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. या परिस्थितीत कर्जत, खालापुरातील शेतकरी वेगवेगळ्या जातीच्या भाताची लागवड करत असतो.
- खालापूर तालुक्यात २,७५० हेक्टर क्षेत्रावर यंदा भातलागवड झाली आहे. सप्टेंबर अखेरीस भातपीक जोमाने आले असून, लोंबी तयार झाल्या आहेत, परंतु पावसामुळे हातचे पीक वाया जाण्याची भीती आहे. मजुरांची कमतरता, वाढलेल्या मजुरीमुळे मिळाणारे जेमतेम उत्पन्न अतिवृष्टीमुळे जाण्याची शक्यता आहे.
----------------------------------------------
नदीकाठच्या शेतीला फटका
पावसाची संततधारेचा सर्वाधिक फटका नदीकाठच्या शेतीला बसला आहे. पाताळगंगा, कुंडलिका, काळ, सावित्री नद्यांच्या लगतच्या सखल भागात पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. एका बाजूला पावसाचे पाणी, दुसऱ्या बाजूने उधाणामुळे किनारपट्टीलगतची खलाटी भरुन गेली आहे. अशा परिस्थितीत समुद्राकडून येणाऱ्या ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने येणाऱ्या वाऱ्याने भाताच्या लोंब्या वाकल्या आहेत. या भागात साचलेल्या पाण्यामुळे भातपीक खराब होण्याची भीती आहे.
----
दोन दिवसांत ३४ मिमी
शुक्रवार सायंकाळपासून सुरु झालेल्या पावसाची सर्वाधिक सरासरी म्हसळा, माणगाव, महाड, पोलादपुर या तालुक्यांमध्ये आहे. दोन दिवसात सरासरी ४३ मिमी पाऊस पडला. माथेरानमध्येही पावसाची सरासरी २५ मिमी इतकी नोंदवली गेली. सतत पडणाऱ्या या पावसाने सुर्यदर्शन झालेलेच नाही. सततचा पाऊस, दमट हवा यामुळे वातावरणात चांगलाच गारवा आला आहे.
----
भातपीक तयार होत असल्याने पावसाचे प्रमाण कमी होणे गरजेचे होते. सतत पडत असलेल्या पावसाने पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. प्राथमिक अंदाजानुसार किती हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे, हे सांगता येणे कठीण आहे.
- वंदना शिंदे, जिल्हा कृषी अधिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Chaitanyanand Saraswati : स्वामी चैतन्यानंद सरस्वती याला ५ दिवसांचा पोलिस कोठडी; पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा झटका

IND vs PAK Final: ICC ने दंड ठोठावल्यावर सुधारला पाकिस्तानी ओपनर, पण आऊट होताच भडकला अन्...; VIDEO

Balasaheb Thorat: संकटातील बळीराजाला कर्जमाफी द्या : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात; सरकारला गांभीर्य नाही

IND vs PAK Final Live: जसप्रीत बुमराहने स्पेल संपवला, आता भारताची वाढणार डोकेदुखी? ८ फलंदाजांसह उतरलेत, कोण उचलणार 'डेथ ओव्हर'चा भार?

Amit Shah: देशातून नक्षलवाद कधी नष्ट होणार? अमित शहांनी मोठी घोषणा करत थेट तारीखच सांगितली, म्हणाले...

SCROLL FOR NEXT