मुंबई

छट पूजा-दिवाळीसाठी मध्य रेल्वेकडून ६० अतिरिक्त विशेष गाड्या !

CD

दिवाळी, छटसाठी मध्य रेल्वेकडून ६० अतिरिक्त विशेष गाड्या
मुंबई, ता. २८ : दिवाळी, छट पूजेसाठी प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने तब्बल ६० अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यात सीएसएमटी-आसनसोलदरम्यान १२ फेऱ्या, सीएसएमटी-करीमनगरदरम्यान १२ साप्ताहिक वातानुकूलित फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस-मुजफ्फरपूरदरम्यान १२ फेऱ्या आणि पुणे-हजरत निजामुद्दीनदरम्यान २४ द्विसाप्ताहिक सुपरफास्ट फेऱ्यांचा समावेश आहे.

ट्रेन क्रमांक ०११४५ सीएसएमटी-आसनसोल वातानुकूलित विशेष गाडी ६ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रत्येक सोमवारी सकाळी ११.०५ वाजता सीएसएमटीहून सुटेल. परतीसाठी ट्रेन क्रमांक ०११४६ ही गाडी ८ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक बुधवारी रात्री ९ वाजता आसनसोलहून सुटेल. ट्रेन क्रमांक ०१०२१ सीएसएमटी-करीमनगर वातानुकूलित विशेष गाडी ११ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रत्येक शनिवारी रात्री १२.२० वाजता सीएसएमटीहून सुटेल. परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०१०२२ त्याच कालावधीत प्रत्येक शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता करीमनगरहून सुटेल. याशिवाय लोकमान्य टिळक टर्मिनस-मुजफ्फरपूर साप्ताहिक वातानुकूलित विशेष १२ फेऱ्या आणि पुणे-हजरत निजामुद्दीन द्विसाप्ताहिक सुपरफास्ट वातानुकूलित विशेष २४ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या सर्व गाड्यांचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या आरक्षण केंद्रांवर तसेच ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK, Final: 33 runs 9 wickets ! पाकिस्तानी गडगडले; हवेत उडत होते, भारतीय स्पिनर्सने जमिनीवर आपटले

IND vs PAK Final Live: हायव्होल्टेज ड्रामा! सूर्यकुमार यादव पाकिस्तानी कर्णधार सलमान आगावर संतापला; अम्पायरसोबत वाद, वाचा नेमका काय राडा झाला

Swami Chaitanyanand Saraswati : स्वामी चैतन्यानंद सरस्वती याला ५ दिवसांचा पोलिस कोठडी; पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा झटका

IND vs PAK Final: ICC ने दंड ठोठावल्यावर सुधारला पाकिस्तानी ओपनर, पण आऊट होताच भडकला अन्...; VIDEO

Balasaheb Thorat: संकटातील बळीराजाला कर्जमाफी द्या : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात; सरकारला गांभीर्य नाही

SCROLL FOR NEXT