मुंबई

रिक्त पदांमुळे रुग्ण सेवा अडचणीत

CD

किन्हवली, ता. २८ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यातील शहापूर हा एकमेव आदिवासी व दुर्गम तालुका असून, येथे शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आहे. या रुग्णालयावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तरीही रुग्णालयातील अनेक महत्त्वांची पदे रिक्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ही पदे कायमस्वरूपी भरण्यात यावीत, याबाबत शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी आरोग्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.
शहापूर उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रशस्त इमारत उपलब्ध असूनही इमारतीमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तालुक्यातील बराचसा भाग मुंबई-आग्रा महामार्गालगत आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात घडत असतात. अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार होणे गरजेचे असूनही ग्रामीण भागातील किंवा अपघातग्रस्तांना ठाणे, मुंबई येथे उपचारासाठी जावे लागते. हे रुग्णांना त्रासदायक असून खर्चिक आहे. ट्रामा केअर सेंटर शहापूरमध्ये सुरू झाल्यास रुग्णांची अपघातग्रस्त रूग्णांना वेळेत उपचार मिळतील. यामुळे त्यांचा जीव वाचविणे शक्य होईल. ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने शर्थीचे प्रयत्न करावे, अशी मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.
रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, सी.टी. स्कॅन ऑपरेटर ही पदे वारंवार रिक्त होत असल्याने उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असते. ही पदे कायमस्वरूपी भरण्यात यावीत, यासाठी माजी आमदार बरोरा यांनी आरोग्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.

नागरिकांमध्ये असंतोष
या महिन्यात उपजिल्हा रुग्णालयात तीन सर्पदंश झालेल्या रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांमुळे गोरगरीब नागरिकांना चाचणी आणि उपचारासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. ही खर्चिक आणि खेदाची बाब आहे.

ट्रॉमा केअरची मागणी
नागरिकांची आरोग्यविषयक गैरसोय लक्षात घेता शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे भरणे, ट्रामा केअर सेंटर मंजूर करणे, सिटी स्कॅन सेवा कायम उपलब्ध ठेवणे, अतिदक्षता कक्ष, व्हेंटिलेटर, पुरेसा व अत्यावश्यक औषधासाठी उपलब्ध करणे व रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी संबधितांना त्वरित सूचना करण्याची मागणी माजी आमदार बरोरा यांनी केली आहे.

मागणीची दखल
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या मागणीची दखल आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी घेतली असून याबाबत आरोग्य सहसंचालक सुनिता गोल्हाइत यांनी ठाण्याचे आरोग्य सेवा उपसंचालक व जिल्हा शल्यचिकित्सक यांना संबंधित रुग्णालयात आजपर्यंत झालेली कार्यवाही व वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यात यावे, असे लेखी आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Chaitanyanand Saraswati : स्वामी चैतन्यानंद सरस्वती याला ५ दिवसांचा पोलिस कोठडी; पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा झटका

IND vs PAK Final: ICC ने दंड ठोठावल्यावर सुधारला पाकिस्तानी ओपनर, पण आऊट होताच भडकला अन्...; VIDEO

Balasaheb Thorat: संकटातील बळीराजाला कर्जमाफी द्या : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात; सरकारला गांभीर्य नाही

IND vs PAK Final Live: जसप्रीत बुमराहने स्पेल संपवला, आता भारताची वाढणार डोकेदुखी? ८ फलंदाजांसह उतरलेत, कोण उचलणार 'डेथ ओव्हर'चा भार?

Amit Shah: देशातून नक्षलवाद कधी नष्ट होणार? अमित शहांनी मोठी घोषणा करत थेट तारीखच सांगितली, म्हणाले...

SCROLL FOR NEXT