मुंबई

ऑनलाइन शोषणाला बळी पडणाऱ्यांच्या मदतीला मोबाईल अॅप

CD

ऑनलाइन शोषणाला बळी पडणाऱ्यांच्या मदतीला मोबाईल ॲप
- ‘ब्रश ऑफ होप’च्या मोबाईल ॲपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्‍ते लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : डिजिटल उपकरणाचा वापर करून होणाऱ्या शोषणाबरोबरच ऑनलाइन शोषणाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये बळी पडणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे. त्याला चाप बसावा, बळी पडलेल्यांना मदत व्हावी, यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या सहकार्याने ‘ब्रश ऑफ होप’ने तयार केलेल्या मोबाईल ॲप्लिकेशनचे, चॅटबॉट आणि सुधारित वेबसाईटचे शनिवारी (ता. २७) वरळी येथे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून हजेरी लावली. हे ॲप सायबर क्राईमसाठी गेमचेंजर ठरेल. पीडितांना चांगली मदत ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले. तसेच या ॲपमुळे महिला सक्षमीकरणाला आणखी बळ मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘ब्रश ऑफ होप’च्या कार्यक्रमाला महाराष्ट्र सायबरचे अतिरिक्त पोलिस महासंचालक यशस्वी यादव, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अभिनेते जॅकी भगनानी, डॉ. शीतल गगराणी, मिनू देवरा, रूपल कनकिया, गायत्री ओबेरॉय, यशस्वी यादव आदी उपस्थित होते. डिजिटल उपकरणाचा वापर करून होणारे शोषण आणि सेक्सटॉर्शनच्या त्रासाला बळी पडून आपले जीवन गमावलेल्या डॉ. गगराणी यांच्या भाची स्वरा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. शीतल गगराणी यांनी ‘ब्रश ऑफ होप’ ही संस्था निर्माण केली.

समाजाला अशा ॲपची गरज
आजच्या काळात ‘ब्रश ऑफ होप’ने निर्माण केलेल्या या ॲपची खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हेदेखील महत्त्वाचेे पाऊल आहे. अशा अत्‍याचाराने पीडित प्रत्येक व्यक्तीसाठी हे ॲप सहाय्यभूत ठरेल, असे गौरवोद्गार अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनी काढले. अशा प्रकारांना रोखण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग नेहमीच तत्पर असतो. ब्रश ऑफ होपचे हे ॲप सायबर गुन्ह्याने पीडितांना नक्कीच सहाय्यभूत ठरणारा आहे. महाराष्ट्र सायबरचे याकामी ‘ब्रश ऑफ होप’ संस्थेला नेहमीच पाठबळ असेल, अशी ग्वाही महाराष्ट्र सायबरचे अतिरिक्त पोलिस महासंचालक यशस्वी यादव यांनी दिली.

मोबाईल ॲपद्वारे या सेवा
त्वरित सहाय्य, प्रशिक्षित समुपदेशक आणि कायदेतज्ज्ञांशी त्वरित संपर्क, सुलभता आणि सुविधा, वापरकर्त्यास अनुकूल असा इंटरफेस, गोपनीयता आणि सुरक्षा, पीडितांना मदत मिळविण्यासाठी एक सुरक्षित डिजिटल सहाय्य, व्यापक मार्गदर्शन, भावनिक, कायदेशीर मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK, Final: 33 runs 9 wickets ! पाकिस्तानी गडगडले; हवेत उडत होते, भारतीय स्पिनर्सने जमिनीवर आपटले

IND vs PAK Final Live: हायव्होल्टेज ड्रामा! सूर्यकुमार यादव पाकिस्तानी कर्णधार सलमान आगावर संतापला; अम्पायरसोबत वाद, वाचा नेमका काय राडा झाला

Swami Chaitanyanand Saraswati : स्वामी चैतन्यानंद सरस्वती याला ५ दिवसांचा पोलिस कोठडी; पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा झटका

IND vs PAK Final: ICC ने दंड ठोठावल्यावर सुधारला पाकिस्तानी ओपनर, पण आऊट होताच भडकला अन्...; VIDEO

Balasaheb Thorat: संकटातील बळीराजाला कर्जमाफी द्या : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात; सरकारला गांभीर्य नाही

SCROLL FOR NEXT