मुंबई

रेल्वे हॉस्पिटलच्या नवीन इमारतीचे उद्‍घाटन

CD

रेल्वे हॉस्पिटलच्या नवीन इमारतीचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मध्य रेल्वेच्या भायखळा येथील रुग्णालयामधील नवीन सुपरस्पेशालिटी इमारतीचे उद्‍घाटन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या हस्ते करण्यात आले. रुग्णालयात आता मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स, हाय डिपेंडन्सी युनिट्स, ऑन्कोलॉजी आणि नेफ्रोलॉजी युनिट्ससह अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा सुरू झाल्या आहेत. ही इमारत ग्राउंड प्लस सहामजली असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
याप्रसंगी मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या (सीआरडब्ल्यूडब्ल्यूओ) अध्यक्षा आशा मीना यांनी हॉस्पिटलसाठी दोन वॉटर प्युरिफायर्स, दोन इंडक्शन कुकटॉप्स, चार इलेक्ट्रिक केटल्स आणि एक डिजिटल वजनमापन यंत्र भेट स्वरूपात दिले. महाव्यवस्थापकांनी रुग्णसेवा सुधारण्याच्या मध्य रेल्वेच्या बांधिलकीवर भर देत डॉक्टर, कर्मचारी आणि कल्याण संस्थांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. या उद्‍घाटन कार्यक्रमात मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. शोभा जगन्नाथ, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक नीरज कुमार दोहरे, प्रधान मुख्य अभियंता रजनीश माथूर आणि इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात सीआरडब्ल्यूडब्ल्यूओच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि मान्यताप्राप्त रेल्वे संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. नंतर रॅपिकॉन हॉलमध्ये आयोजित सत्रात डॉ. संजीव यांनी नवीन पायाभूत सुविधा सुरू करण्याच्या प्रवासाचे तपशीलवार वर्णन केले, तर डॉ. शोभा जगन्नाथ यांनी या सुविधांचा परिणाम आणि भविष्यात स्वतंत्र पदव्युत्तर शिक्षण संस्था म्हणून अपग्रेड करण्याच्या योजना स्पष्ट केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: बुमराहने काढलं बुक्कीत टेंगूळ! यॉर्करवर हॅरिस रौफचा 'दांडा' उडवला अन् प्लेन क्रॅशचं चोख उत्तर, Celebration Video Viral

Thane: ठाणे बनणार वेगवान वाहतुकीचे 'मल्टीमोडल' जंक्शन! बुलेट ट्रेन स्थानकाला रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो जोडणार, वाचा सविस्तर...

Sharad Pawar: ‘शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी: ज्येष्ठ नेते शरद पवार; अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान

Palghar Rain: पालघरमध्ये पावसाचा जोर वाढला, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जनजीवन विस्कळीत

IND vs PAK, Final: 33 runs 9 wickets ! पाकिस्तानी गडगडले; हवेत उडत होते, भारतीय स्पिनर्सने जमिनीवर आपटले

SCROLL FOR NEXT