कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यानात वृक्षलागवड
वाशी, ता. २९ (बातमीदार) ः नवी मुंबई पालिका उद्याान विभागाच्या वतीने हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र संकल्पनेअंतर्गत लोकसहभागातून कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यानात वृक्षारोपण उत्साहाने राबविण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. कोपरखैरणे येथील निसर्ग उद्याानात मियावाकी स्वरुपाचे दाट शहरी जंगल विकसीत करण्यात आले आहे. या हरित वैभवात भर पडावी यादृष्टीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी त्या परिसरात वृक्षदिंडी काढून पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा संदेश प्रसारित करण्यात आला. उद्यान विभाग उपायुक्त स्मिता काळे यांच्या नियंत्रणाखाली आयोजित या वृक्षारोपण उपक्रमात सहाय्यक आयुक्त ऋतुजा गवळी, सहाय्यक उद्यान अधिकारी भालचंद्र गवळी, उद्यान अधीक्षक विजय कांबळे, उद्यान सहाय्यक श्रीकांत जाधव, कोपरखैरणे विभाग अधिकारी भरत धांडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
त्यांच्यासमवेत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य, स्थानिक मंडळे व स्वयंसेवी संस्था, कॉन्सर्टो पेमेंट सिस्टिम महापे येथील व्यवस्थापक जितेश नायर व कर्मचारी, ख्राइस्ट अकॅडमी स्कूलचे शिक्षक आणि १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सहभाग घेतला. या वृक्षारोपणामध्ये प्रामुख्याने देशी वृक्षरोपे लागवडीवर भर देण्यात आला असून चिकू, फणस, जाम, पेरू, चिंच, सिताफळ, जांभूळ, आवळा, स्टार फ्रूट आणि आंबा यांसारख्या वैविध्यपूर्ण ५०० फळझाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली.
स९स९स९स९स९स९स९स९स९स९स९स९
यू.ई.एस. कॉलेजमध्ये महिला कायद्यांसंबंधी मार्गदर्शन
उरण, ता. २९ (वार्ताहर) ः यू. ई. एस. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजीच्या महिला विकास कक्षेतर्फे महिलांच्या हक्कांबद्दल आणि कायद्यांसंबंधी महत्त्वाच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला यू. ई. एस. संस्थेच्या सहसचिव ॲड. अपूर्वा ठाकूर यांनी प्रमुख पाहुण्या आणि मुख्य वक्ता म्हणून उपस्थिती लावली.
ठाकूर यांनी उपस्थित विद्यार्थी आणि प्राध्यापकांना महिलांचे अधिकार आणि कायदे याबद्दल मोलाचे आणि सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांच्या कायदेशीर संरक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी सिनियर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. मिनाक्षी गुप्ता, विभागाचे प्रमुख, प्राध्यापक वर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
स*९स**सस*स*स*
पनवेल पालिकेतर्फे दिव्यांग शिबिराचे आयोजन
पनवेल (बातमीदार) ः पनवेल पालिकेतर्फे रोडपाली सेक्टर-१९ येथे शुक्रवारी (ता. २६) आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बांधवांसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात युडीआयडी कार्ड नसलेल्या दिव्यांगांना नवीन कार्ड काढून देण्यात आले. दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरास एकूण ६७ दिव्यांग बांधव उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय विभागाच्या वतीने दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. यावेळी उपायुक्त रविकिरण घोडके, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद गोसावी, दिव्यांग विभाग प्रमुख हरेश जाधव, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
*सससससससस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.