मुंबई

रूग्णालयातील रांगांपासून आभा अ‍ॅपमुळे सुटका

CD

रुग्णालयातील रांगांपासून आभा अ‍ॅपमुळे सुटका
ऑनलाइन नोंदणी करणारे वाशी रुग्णालय टॉप थ्रीमध्ये
वाशी, ता. २९ (बातमीदार) ः आरोग्यसेवांमध्ये डिजिटलायझेशनचा वापर करून नागरिकांना विनासायास उत्तम दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आयुष्मान भारत डिजिटल मिशनअंतर्गत आभा ॲप केंद्र सरकारने सुरू केले आहे. हे अ‍ॅप आता नागरिकांसाठी लाभदायक ठरत आहे. या ॲपमुळे नागरिकांचा केसपेपरसाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचत आहे.
अखिल भारतीय डिजिटल मिशनमार्फत या उपक्रमाकरिता महाराष्ट्रातून सहा मॉडेल फॅसिलिटीची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये नवी मुंबई पालिकेचे सार्वजनिक रुग्णालय, वाशी हे संपूर्ण देशातील निवड झालेल्या १३१ रुग्णालयांपैकी एक आणि सर्व पालिका रुग्णालयांतून निवड झालेले एकमेव रुग्णालय आहे.
या उपक्रमाला पहिल्या दिवसापासूनच रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचा प्रतिसाद लाभत असून, आतापर्यंत पाच लाख ३६ हजार ७३७ इतके टोकन दिलेले आहेत. रुग्णालयामध्ये येणाऱ्या साधारणत: ६५ टक्के रुग्णांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. त्यामुळे नागरिकांचा टोकनसाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास पूर्णत: वाचला आहे.
सर्वाधिक आभा टोकन देणारे पालिका रुग्णालय, वाशी हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम तीन रुग्णालयांपैकी एक आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार वाशी रुग्णालयासोबतच माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय, नेरूळ आणि राजमाता जिजाऊ रुग्णालय, ऐरोली या रुग्णालयांमध्येही ऑनलाइन केसपेपर दिले जात असून, ही रुग्णालयेदेखील ऑनलाइन रुग्ण नोंदणीमध्ये अग्रेसर आहेत.

वैद्यकीय इतिहास उपलब्ध
आभा उपक्रमामुळे क्यूआर कोड स्कॅन करून आभा अ‍ॅपव्दारे झटपट नोंदणी होते. प्रत्येक रुग्णाचे वैद्यकीय रेकॉर्ड त्याने नोंदणी केलेल्या अ‍ॅपमध्ये डिजिटल स्वरूपात संग्रहित केले जात असून, त्याचा हा वैद्यकीय इतिहास त्याच्यावर भविष्यातील उपचारांसाठी वापरता येणार असल्याने महत्त्वाचा ठरत आहे. याद्वारे डॉक्टरांना रुग्णाचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास उपलब्ध होत असल्याने त्याच्या आजाराचे निदान करणे आणि त्याच्यावर योग्य उपचार जलद करण्यास मदत होते.

उपचारासाठी पालिका रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आभा अ‍ॅप डाऊनलोड करून रांगेत उभे न राहता ऑनलाइन टोकन नंबर त्वरित प्राप्त करून घ्यावे आणि त्यासोबत आभा अ‍ॅपवर असलेली आपले वैद्यकीय रेकॉर्ड एकत्रित ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून घ्यावी. सर्वच नागरिकांनी आभा अ‍ॅपचा वापर ते डाऊनलोड करून घ्यावा.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'छत्रपती शिवाजी महाराज लिंगायत समाजाचे, कन्नड वंशाचे होते'; कन्नड साहित्यिकाच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

Prataprao Pawar: कृषी क्षेत्रात ‘एआय’चा नवा अध्याय; प्रतापराव पवार, ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात ‘एआय-एमएल-आयओटी’ सामंजस्य करार

Sakal Premier League: आजपासून रंगणार ‘सकाळ प्रीमिअर लीग’चा थरार; विजेत्या संघाला दोन लाखांचा पुरस्कार, विजेतेपदासाठी झुंजणार ३२ संघ

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; कंटेनर चालकासह दोघांचा जागीच मृत्यू, चार गंभीर जखमी

India Women Kabaddi: भारत अंतिम फेरीत दाखल; महिला विश्वकरंडक कबड्डी, इराणवर मात

SCROLL FOR NEXT