खेळामुळे भविष्यकाळ उज्ज्वल होण्यास मदत
सकाळ एनआयईच्या उपक्रमात क्रीडा समीक्षकांचे मार्गदर्शन
अलिबाग, ता. २९ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्याचा कबड्डी खेळात दबदबा आहे. आता गावागावातून कबड्डीचे सामने भरविले जातात, परंतु हा खेळ सराव, व्यायाम व शिस्तीच्या बळावर खेळल्यास भविष्यकाळ उज्ज्वल होऊ शकतो. खेळातून अनेक नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होत आसल्याचे क्रीडा समीक्षक प्रकाश सोनावडेकर यांनी सांगितले.
अलिबाग नगर परिषदेच्या शाळा क्रमांक ४ मध्ये सकाळ एनआयईतर्फे ऑनग्राउंड कबड्डी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लहानपणापासूनच येथील मुलांना कबड्डी खेळाची आवड असल्यामुळे आजच्या सकाळ एनआयईच्या ऑनग्राउंड कबड्डी मार्गदर्शन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. या वेळी ॲड. हर्षल मोरे, शाळेचे मुख्याद्यापक अंकुश गावंड, शिक्षक मंजूषा शेळके, समता म्हात्रे, राजू लोटे आदी उपस्थित होते. पूर्वी खेळ फक्त मनोरंजन म्हणून खेळले जात. त्यानंतर खेळात व्यावसायिकता आली, पण त्याचबरोबर नोकऱ्यांच्या अनेक संधीही उपलब्ध झाल्या आहेत. आज अनेकजण पोलिस व इतर क्षेत्रात केवळ खेळातील कर्तबगारीमुळे कार्यरत आहेत. एखाद्या खेळाडूला राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय पदक मिळते तेव्हा त्या खेळाडूच्या हातात तिरंगा दिला जातो. तसेच त्या खेळाडूसाठी आपल्या देशाचे राष्ट्रगीत वाजविले जाते तेव्हा तो त्या खेळाडूच्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण असतो. ही ताकद खेळात आहे.
लहान वयातच खेळाबाबत योग्य संस्कार झाले, जो खेळ निवडला असेल त्याचे सर्व नियम व त्या खेळाच्या मैदानाची माहिती असणे आवश्यक असते. खेळ कोणताही असो योग्य प्रशिक्षक मिळविणेही तितकेच गरजेचे आसते, असे सोनावडेकर म्हणाले. तर सकाळ एनआयई शाळेतील विद्यार्थ्यांना अंक देऊन अवांतर वाचनाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे मुलांमध्ये खिळाडूवृत्ती वाढावी, त्यांचे खेळात चांगले करिअर व्हावे, यासाठी ‘चला खेळूया’सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे, हे सगळं कौतुकास्पद असल्याचे मुख्याध्यापक अंकुश गावंड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.