मुंबई

ज्ञानदीप शाळेत शिक्षकांसाठी एआय प्रात्यक्षिक व्याख्यान

CD

ज्ञानदीप शाळेत शिक्षकांसाठी एआय व्याख्यान
नेरूळ, ता. ३० (बातमीदार)ः शिक्षक घडले तरच विद्यार्थी घडतील या विचारातून न्यू ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूट, नेरूळ आणि ज्ञानदीप सेवा मंडळ करावे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानदीप सेवा मंडळाची प्राथमिक, माध्यमिक आणि इंग्रजी माध्यम शाळेतील शिक्षकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवरील (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) विशेष व्याखानाच्या आयोजन करण्यात आले.
या सत्राची विशेषता म्हणजे ते प्रात्यक्षिक स्वरूपाचे होते. शिक्षकांना प्रत्यक्ष ये आय टूल्स दाखवून त्यांच्या माध्यमातून अध्यापन अधिक प्रभावी, आकर्षक आणि परिणामकारक कसे बनवता येईल याचे मार्गदर्शन करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यास आणि वापर केवळ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगतीसाठीच नव्हे, तर देशाच्या प्रगतीसाठी ही अत्यावश्यक असल्याचे या वेळी अधोरेखित करण्यात आले. तसेच भविष्यात प्रत्येक शाळेत शिक्षकांसाठी एआय प्रशिक्षण अनिवार्य होण्याची शक्यता यावरही चर्चेत भर देण्यात आला.
सध्याच्या तंत्रज्ञान युगात प्रत्येक शाळेत असेच कार्यक्रम राबवल्या शिक्षकांच्या शिकवण्यातील प्रभावीपणा वाढेल आणि त्या प्रभावातूनच विद्यार्थी घडतील असे आयोजक संस्थांनी स्पष्ट केले. सदर कार्यक्रमाला न्यू ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूट तर्फे संचालक सतीश गांगुर्डे, व्याख्याते संदेश मून, माधव गायकवाड आणि उमाजी उपस्थित होते, तर एमकेसीएलकडून प्रियंका गुप्ता आणि सोनम भारद्वाज या प्रशिक्षकांनी सहभाग नोंदविला. तसेच ज्ञानदीप प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बंकट तांडेल आणि इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक रत्नाकर तांडेल यांनी उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले. शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक अरविंद चलवादी यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accenture Lays Off : 'IT'क्षेत्राला 'AI'चा फटका! , ‘Accenture’ ने 11 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

Mumbai Local: लोकल प्रवाशांना होणार फायदा! ७ नवे रेल्वे स्टेशन उभारणार, कुठे आणि कोणते? पाहा सविस्तर

IND vs AUS: हार्दिक पांड्याच्या दुखापतीवर मोठे अपडेट्स! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळणार की नाही?

Google आता तुमच्या मोबाईलवर ठेवणार नजर! Chrome अन् Gemini मध्ये मोठा बदल, डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी बदला 'ही' एक सेटिंग

Jalgaon News : जळगावमध्ये माजी महापौर ललित कोल्हेंसह आठ जणांना अटक; ऑनलाइन विदेशी नागरिकांची लूट

SCROLL FOR NEXT