आरक्षणात घुसखोरी सहन होणार नाही
अनुसूचित जमाती संघर्ष समितीचा निर्धार; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
अलिबाग, ता. ३० (वार्ताहर) : अनुसूचित जमाती बांधवांच्या आरक्षणातील घुसखोरी रोखली नाही तर शासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रायगड अनुसूचित जमाती संघर्ष समितीतर्फे देण्यात आला. यासाठी मंगळवारी (ता. ३०) अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून झाली. वाजत-गाजत व घोषणाबाजी करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. आदिवासी बांधवांच्या मोठ्या उपस्थितीमुळे अलिबाग शहरात वातावरण उत्साहपूर्ण व आक्रमक बनले होते. यावेळी माजी समाज कल्याण सभापती आणि आदिवासी नेते दिलीप भोईर म्हणाले, की कोकणात आदिवासी, कोळी, भोई, धनगर, ठाकूर, कातकरी समाज शतकानुशतके वास्तव्यास आहे. हेच या भूमीचे खरे मूळ निवासी आहेत. मात्र सरकारने नेहमी या समाजाकडे दुर्लक्ष करत आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणाचा हेतू आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी होता. पण आज त्यात बाहेरील घटक घुसखोरी करून आमचे हक्क हिरावून घेत आहेत. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. शासनाने याची दखल घेतली नाही तर मंत्रालयावरही मोर्चा नेण्यात येईल. या प्रसंगी संघर्ष समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना निवेदन सादर करण्यात आले. यात आरक्षणातील घुसखोरी थांबवावी, तसेच आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.
................
समाजनेत्यांचे मार्गदर्शन
मोर्चाच्या शेवटी विविध समाजनेत्यांनी उपस्थित बांधवांना मार्गदर्शन केले. रायगड जिल्हा कातकरी समाज अध्यक्ष भगवान नाईक, आदिवासी कोळी कोकण विभागीय अध्यक्ष जलदीप तांडेल, अलिबाग तालुका कातकरी समाज अध्यक्ष मुकेश नाईक, ठाकूर समाज अध्यक्ष धर्मा लोगे, तसेच माजी अध्यक्ष सुरेश नाईक, मोरेश्वर हाडके, गजानन पाटील, रवींद्र वाघमारे, भरत पाटील, पांडुरंग वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समाजबांधव यात सहभागी झाले. मोर्चाच्या यशस्वी आयोजनातून रायगडातील आदिवासी बांधवांची एकजूट स्पष्ट झाली. संघर्ष समितीने दाखवलेली भूमिका ही आगामी काळात शासनासाठी कठीण ठरू शकते, असा सूर समाजबांधवांतून उमटला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.